दारूचे गाडी चालवताना होणारे परिणाम
1. खोटा आत्मविश्वास . दारूमुळे आत्मविश्वास वाढल्याची खोटी भावना येते व निर्णय घेण्यात चुका होतात.
2. संतुलन आणि समन्वय (बॅलन्स) कमी होतो. प्रतिक्रिया मंदावतात
3. वेग, अंतर आणि रस्त्यावरील धोका ह्यांचा अंदाज घेण्याची क्षमता कमी होते
4. कमी प्रमाणातही दारूचे परिणाम ड्रायविंग (वाहन चालवण्याच्या) क्षमतेवर दिसतात व वाहन चालवण्याची क्षमता कमी होते.
5.दारू शरीरातून बाहेर पडण्यासाठी वेळ लागतो. उदा: रात्री दारू प्यायल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी चालवताना तुमच्या वाहन चालवण्याच्या क्षमतेवर (ड्रायविंग वर) परिणाम होऊ शकतो.
ह्या वरील गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात.
सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे गाडी चालवायची असेल तर दारू पिऊ नये. दारू कमी प्रमाणातही धोकादायक असू शकते (तुमच्यासाठी तसेच इतरांसाठी)
जर दारू प्यायची असेल तर येण्याजाण्यासाठी /प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करावी. उदा टॅक्सी किंवा दारू न पिलेला ड्रायवर.
*वरील माहिती हायवे कोड मधून भाषांतरित केली आहे
डॉ. विनायक हिंगणे