थकवा आल्यावर गाडी चालवणे खूप धोकादायक असते. थकलेल्या व्यक्तीचे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. आपण स्वतः आणि रस्त्यावरील इतरांच्या सुरक्षितते साठी थकवा असल्यास किंवा झोप येत असल्यास गाडी चालवू नये. हायवे कोड ह्या पुस्तकातील काही मुद्दे भाषांतरित केले आहेत
1. गाडी चालवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारीत असणे आवश्यक असते. तुम्ही थकलेले असताना प्रवासाला (ड्रायविंगला) सुरुवात करू नका. गाडी चालवत मोठा प्रवास करायचा असेल तर रात्रीची छान झोप घ्या.
2. गाडीचा प्रवास रात्री 12 ते सकाळी 6 ह्या काळात टाळावा. ह्या काळात आपली सतर्कता कमी असते.
3.आपल्या प्रवासात मुबलक विश्रांतीसाठी थांबायचं नियोजन करावं. दर दोन तासांनी कमीत कमी 15 मिनिटं थांबायला हवं.
4. गाडी चालवताना झोप येत असेल तर सुरक्षित जागा बघून गाडी थांबवावी. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून उभी करू नये.
5. कमीत कमी 15 मिनिट झोपल्यास किंवा 2 कप कॉफी (कॅफिन असलेली) प्यायल्यास झोप न येण्यास मदत होऊ शकते
डॉ विनायक हिंगणे