Scroll to top

तरुणांचे आरोग्य


vinayakhingane - November 1, 2019 - 2 comments

जीवनशैलीचे आजार हे पूर्वी उतारवयात होणारे आजार म्हणून ओळखल्या जायचे. ते आजकाल तरुण पिढीत सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसायला लागले आहेत. इतक्यातच मी चाळीशीच्या आतील दोन तरुणांचा हृदयविकाराच्या मोठ्या झटक्यासाठी उपचार केला. वय वर्ष 30 ते 35 अशा वयोगटातील बरेच पेशंट उच्च रक्तदाब आणि डायबेटीस साठी दाखवायला येतात. ह्यांचे सगळ्यांचे आजार हे जीवनशैलीतील दोषांशी निगडित आहेत. जीवनशैली बदलल्यावर हे आजार बरे झाले. जीवनशैली चे आजार तरुण वयात मोठ्या प्रमाणात दिसणे हे काळजीचे आहे.

आपण सगळ्यांनी निरोगी जीवनशैली शिकायला हवी आणि त्याचा प्रचार करायला हवा. टाइप 2 डायबेटीस, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार टाळता येतात. यांचे निदान लवकर झाले तर त्यातून होणारे त्रास सुद्धा टाळता येतात. आहार नियंत्रण ,व्यायाम आणि पुरेशी झोप हे जीवनशैलीचे महत्वाचे उपचार आहेत. सुरुवातीला हेच उपचार पुरेसे ठरतात. ह्या उपायांनी आजार टाळता सुद्धा येतात. A stitch in time saves nine ह्या म्हणीप्रमाणे आपण सतर्क राहिल्यास मोठा त्रास टाळू शकतो.

तपासणी:

आपले हिमोग्लोबिन, साखरेची पातळी , एच बी ए1 सी , कोलेस्टेरॉल(लिपिड प्रोफाइल), ईसीजी इत्यादी तपासण्या आपण करून घेतल्यास आपल्या आरोग्याचे चित्र अधिक स्पष्ट होते. आपले वजन , पोटाचा घेर, हृदयाचे ठोके, ब्लड प्रेशर (रक्तदाब) किती आहे ह्यावर सुद्धा लक्ष असू द्यावे.

उपाय:

  1. आहारात भाज्या आणि फळे भरपूर असावीत. आहारातील उष्मांक(कॅलरी) म्हणजेच ऊर्जा कमी करण्याचा फायदा होतो. जंक फूड किंवा बाहेरचे पदार्थ, पाकिटबंद पदार्थ टाळावेत. आहाराची रोजनिशी(डायरी) ठेवली तर फायदा होतो.
  • व्यायाम नियमित असावा. स्नायू बळकट करणारे आणि हृदय-फुफ्फुसाचे (कार्डीओ) असे दोन्ही व्यायाम करावेत. कमी वेळेसाठी का होईना पण दोन वेळा व्यायाम केल्यास उत्तम. याने आपली शारीरिक हालचाल विभागल्या जाते.
  • दिवसभर भरपूर हालचाल करावी. सारखे बसून राहणे हानिकारक. उभे राहून काम करणे, पायी चालणे, लिफ्ट ऐवजी जिना वापरणे, शारीरिक कामे स्वतः करणे असे उपाय केल्याने शारीरिक हालचाल वाढते. शारीरिक हालचाल वाढवणे हे व्यायामपेक्षा वेगळे आहे. सतत बसने हे धूम्रपानाइतकेच धोकादायक आहे. शारीरिक हालचाल वाढवल्याने आजारांचा धोका कमी होतो.
  • आपल्याला जवळपास आठ तास झोप आवश्यक असते.कमी झोप धोकादायक असते. म्हणून पुरेशी झोप घ्यावी.

ह्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ:

डॉ विनायक हिंगणे

Contact Us
close slider

    Discover more from Vinayak Hingane

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×