रक्त पातळ करणाऱ्या औषधासंदर्भात अनेक जणांना शंका कुशंका असते. औषध नेमकी काय असतात? याने खरोखरच आमचं रक्तपातळ होतं का? ही औषधे घेणे आवश्यक आहे का? याचे दुष्परिमाण काय? याबद्दल रुग्ण विचारतात.
रक्त पातळ करणारी औषध ही खरोखरच रक्त पातळ करत नाहीत. पण आपलं रक्त गोठवण्यापासून थोडं थांबवतात. म्हणजेच रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत थोडा अडथळा निर्माण करतात. रक्त गोठणं हे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. आपल्याला कोणतीही इजा होऊन रक्तस्त्राव होतो. तेव्हा रक्त गोठू लागते. म्हणजेच रक्तस्त्राव होणं थांबते. त्यामुळे आपल्यासाठी रक्ताची गुठली पडणे, खपली पडणे हे फायद्याचे आहे. कधी-कधी शरीराच्या अंतर्गत आजारामध्ये काही आजार असतील किंवा रक्तवाहिन्यांना इजा झाली असेल. त्यांच्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठतं आणि रक्तांची गाठ बनते किंवा गोळा बनतो. तो रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये असतो आणि त्याच्यामुळे रक्तस्त्राव बंद पडतो.
ह्रदयाची रक्तवाहिनी असेल तर ह्रदय विकाराचा झटका येऊ शकतो. तसेच मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये अशी गाठ तयार झाली तर मेंदूचा भाग निकामी होऊ शकतो. परिणामी, पॅरालिसिस होऊ शकतो. तसेच रक्ताची गुठली आपल्या शिरेमध्ये तयार झाली आणि ती फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकली तर फुफ्फुसाला डॅमेज होतो, याला ‘पल्मोनरी एम्बोलिज्म’ असे म्हणतात. त्यामुळे अशी बरीचशी मोठ-मोठी गुंतागुंतीचे आजार हे रक्तवाहिन्यांमध्ये गाठ निर्माण झाल्यामुळे होऊ शकतात. मात्र, हे सगळ्यांच्या बाबतीत होत नाही. पण काहींना विशिष्ट लोकांमध्ये ज्यांना धोका जास्त असतो. अशा लोकांमध्ये घडू शकते. म्हणून अशा लोकांमध्ये रक्ताची गाठ होणे, हा जास्त धोका आहे. त्यामुळे अशा रुग्णांना ही औषधे दिली जातात. ही औषधे दिल्यावर रक्त गोठण्याची प्रक्रिया कमी होते. रक्ताची गाठ होणे टळते. तसेच रक्तवाहिन्या बंद पडणं टळतं. तर यावर वेगवेगळ्या प्रकारची औषधे आहेत.

रक्त गोठवण्यासाठी वेगवेगळे घटक पदार्थ आपल्या शरीरामध्ये काम करत असतात. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत त्या प्लेटलेट्स पेशी. प्लेटलेट्स पेशी या रक्ताच्या अविभाज्य घटक आहेत. यापेशी एकमेकांना चिकटतात आणि एक गोळा तयार करतात. त्यामध्ये रक्त गोठायला सुरुवात होऊन जाते आणि मग रक्ताची गाठ तयार होते. त्यामुळे प्लेटलेट्स पेशी महत्त्वाच्या असतात. तर अशी काही औषधे आहेत. एस्पिरिन, क्लोपिडोग्रेल अशी औषधे प्लेटलेट्सच्या पेशी विरुध्द काम करतात. प्लेटलेट्सचा गोळा बनवू देत नाहीत. रक्ताची गुठली व रक्त गोठणे हे कमी होते. मग शरीराला रक्तस्त्राव सुरळीत सुरू राहतो.
काही प्रकारची औषधे ही आपल्या रक्तामधील घटक प्रथिने, काही रसायने, यांच्या विरुध्द काम करून रक्त गोठवणे थांबतात, याला ‘अँटी क्वॉयग्लोनंटस्’ असे म्हणतात. हिपॅरिन, लो मॉलक्लोन हिपॅरिन ही काही औषधे आपण इंजेक्शनच्या स्वरूपात घेता येतात. याशिवाय काही गोळ्या सुध्दा दिल्या जातात. तर यातील काही औषधे ही धमनीमध्ये रक्ताच्या गाठी होतात. त्या टाळण्यासाठी वापरल्या जातात. काही शिरेमध्ये रक्ताच्या गाठी होतात. त्या टाळण्यासाठी वापरल्या जातात. वेगवेगळ्या धमनी, शिरा किंवा ह्रदयामध्ये सुध्दा रक्त गोठतं. हे सगळं टाळण्यासाठी आपण ही औषधे देत असतो.
अर्थातच ही औषधे सगळ्यांना दिली जात नाहीत. कोणाला धोका जास्त आहे. याचा अंदाज घेऊन ही औषधे दिली जातात. प्रत्येक रुग्णानुसार, रक्त पातळ करणारी वेगवेगळ्या स्वरुपाची औषधे दिली जातात. काही औषधाचे दुष्परिणाम हे त्यांच्या ग्रुपनुसार बदलत असतात. यातील बरेचसे दुष्परिणाम हे सौम्य असतात. पण काही औषधाचे दुष्परिणाम हे गंभीर स्वरूपाचे असू शकतात. यातला मुख्य दुष्परिणाम रक्तस्त्राव होणे हा असतो. एखाद्या रुग्णाला औषधे देत असताना रक्तस्त्राव किती होऊ शकतो. यासंदर्भात तपासण्या केल्या जातात. त्याप्रमाणे औषधे दिली जातात.

तज्ज्ञ डॉक्टर ही औषधे देतात. तसेच अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली घ्यावी लागतात. अँटी प्लेटलेट्स औषधे ही बऱ्यापैकी सौम्य प्रकारची असतात. यामध्ये रक्तस्त्रावासाचा धोका कमी प्रमाणात होत असतो. मोठी शस्त्रक्रिया असेल तेव्हा ही काही औषधे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद ठेवावी लागतात. ह्रदयाच्या झडपा किंवा ह्रदयात इंप्लाट टाकलेल्या असतील. तर अशा लोकांना अँटी प्लेटलेट्सची औषधे सुरू ठेवणे आवश्यक असते.
रक्त पातळ करण्यासाठी ही औषधे आपण घेत असतो. ती पटकन बंद करू नये. तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बंद करावीत. ही औषधे काही खास कारणांसाठी दिलेली असतात. तर अचानक औषधे बंद केल्यावर रक्ताची गुठली होण्याचा धोका जास्त असतो. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आणि काही तपासण्या केल्यानंतरच ही आपण औषधे बंद करू शकतो. औषधाने रक्त पाण्यासारखे पातळ होत नाही. त्यामुळे घाबरू नये. या औषधांचे ठराविक दुष्परिणाम व फायदे असतात.
(अधिक माहितीसाठी युट्यूब लिंकवर जाऊ शकता)