आर्टिफिशियल स्वीटनर कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ इत्यादी औषध मधुमेह रुग्णांनी घ्यावीत का? साखर फ्री पदार्थामध्ये साखर नसते. परंतु कृत्रिमपणे गोडवा आणतात. त्यामुळे साखरेला पर्याय म्हणून हे पदार्थ वापरले जातात. या पदार्थामध्ये साखर नसल्यामुळे रक्तातली साखर सुध्दा वाढत नाही. म्हणून डायबिटीज् रुग्णांसमोर आकर्षक पर्याय असतो. दातांना साखरेपासून जो अपाय होतो, तो याने होत नाही. तसेच कॅलरी सुद्धा पोटात जात नाही. अशा गोष्टी सांगितल्या जातात, त्यानुसार त्यांचे मार्केटिंग केले जाते.

कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ हे रासायनिक पदार्थ असतात. यातील ५ ते ६ पदार्थांना एफडीएने मान्यता दिली आहे. त्यामुळे आर्टिफिशियल स्वीटनरची निवड करू शकता. एका संशोधनानुसार, काही मर्यादेपर्यंतच ही पदार्थ खाल्ली. तर ते सुरक्षित असतात, असे सिध्द झाले आहे. म्हणजेच, सरळ-सरळ कुठला ही अपाय होत नाही. जे लांबपल्ल्यासाठी पदार्थ वापरले जातात. त्यांच्यामध्ये थोडी संदिग्धता आहे.
काही रिसर्च पेपरमध्ये असे दिसून आले की, दीर्घ काळासाठी आर्टिफिशियल स्वीटनर वापरले. त्यांच्यामध्ये वजन वाढणे, भूक वाढणे आणि शरीरात रासायनिक बदल घडून आलेले दिसतात. पोटातील उपयुक्त जीवाणू यांना धोका पोहोचतो. तसेच हानिकारक बदल घडतात. त्यामुळे कृत्रिम स्वीटनर थोड्या वेळासाठी वापरले, तर हानिकारक नाही. पण लांबपल्ल्यासाठी वापरले, तर नक्कीच घातक ठरू शकते.

जेव्हा आपण गोड पदार्थ खातो किंवा गोड पेय पितो. त्यावेळी गोडव्याशिवाय इतर घटक शरीरात जात असतात. त्यांचा सुध्दा शरीरावर परिणाम होत असतो. जितकं आपण खाणं वाढवू, तितकंच शरीरासाठी हानिकारक ठरतं. शितपेयांना सुद्धा पर्याय शोधणं आवश्यक आहे, असे मला वाटते. फक्त साखर फ्री टाकून ते पदार्थ फायद्याचे ठरत नाही. गोड पदार्थांना पर्याय म्हणून फळं खाऊ शकतो. फळांमधून गोडवा तर मिळतोयच. तसेच बरेच घटक ही मिळत असतात. त्यामुळे रोज फळे खा आणि निरोगी राहा.
(खालील दिलेल्या लिंकवर जाऊन संपूर्ण व्हिडिओ सुध्दा पाहू शकता.)