माझ्या क्लिनिकमध्ये बरेचसे पेशंट ऑक्सिजनची पातळी तपासताना तोंडावरचा मास्क ओढून खाली घेतात. लोकांच्या मनामध्ये असा गैरसमज बसला आहे की, मास्कमुळे शरीरातल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी मोजताना ते कमी दिसतं. पण मुळात असे नाही आहे. आपण त्याचे प्रात्यक्षिक बघूया.

माझ्या तोंडावर एन-९५ मास्क असून तो मी बऱ्याच वेळापासून लावलेला आहे. आता माझी ऑक्सिजनची पातळी तपासून पाहूया. आपले बोट हे प्लस ऑक्सिमीटरमध्ये ठेवायचे. त्यानंतर प्लस ऑक्सिमीटरवरील बटन दाबायचे. प्लस ऑक्सिमीटरवर एक आलेख आलेला दिसतो. ऑक्सिजनची पातळी मोजत असताना ते वर-खाली होत असतं. पण काही वेळाने (३० सेकंद) स्थिर होऊन एक आकडा दिसू लागतो.
जर का, मी तोंडाचा मास्क काढला, तर आवाजामध्ये फरक जाणवेल. परंतू प्लस ऑक्सिमीटरमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक जाणवणार नाही. ऑक्सिजनचे प्रमाण जेव्हा शरीरातलं कमी होतं. तेव्हा प्लस ऑक्सिमीटर हे मोजत आणि त्यांच गणित तयार होतं. मग आपल्याला एक आकडा दिसतो. फुफ्फुसामध्ये डॅमेज झालेले असेल. कोरोनामध्ये फुफ्फुसाला इजा होते आणि दोष निर्माण होतात. त्यावेळी पुरेसा ऑक्सिजन रक्तात खेचला जात नाही. त्याच्यामुळे ऑक्सिजन कमी होताना दिसून येतो. म्हणून मास्क लावल्याने ऑक्सिजनवर परिणाम होत नाही. समजा, तुमची ऑक्सिजनची पातळी कमी दिसत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

बोटावर नेलपेंट किंवा इजा झालेली असेल तसेच हात-पाय थंड पडलेले असतील. अशा परिस्थितीमध्ये प्लस ऑक्सिमीटर ऑक्सिजन योग्य पध्दतीने मोजत नाही. कधी-कधी ऑक्सिजन मीटरचा सुध्दा दोष असू शकतो. म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. पण तुम्ही एकाच ऑक्सिजन मीटरने नेहमी ऑक्सिजन मोजत असाल आणि हळूहळू तो कमी होताना दिसत असेल तर मात्र डॉक्टरांना भेटून तपासण्या केल्या पाहिजेत. तुम्हाला कोरोनाची काही लक्षणे असतील तर ऑक्सिजन मीटरवर ऑक्सिजन मोजत रहा. मास्क वापरल्याने आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होताना दिसलेले नाहीत. त्यामुळे मास्कचा वापर योग्य प्रकारे वापर करा.