High intensity Interval training (HIIT) हा व्यायामाचा खूप चांगला प्रकार आहे. यामध्ये आपण व्यायाम जलद करतो. आणि हा इंटर्व्हल्समध्ये करतो. म्हणजेच मधे मधे व्यायाम करतो आणि मधे थोडी विश्रांती सुध्दा घेतो. अशा पध्दतीने जर व्यायाम केला तर आपली शारीरिक क्षमता, ह्रदय व फुफ्फुसाची क्षमता वाढायला बरीच मदत होते. हा व्यायाम सोपा असतो आणि बऱ्याच पध्दतीने करता येतो.

सायकलिंग, धावणे अशा वेगवेगळ्या व्यायाम प्रकारामध्ये HIIT करू शकतो. आपले जे घरगुती व्यायाम असतात, त्यामध्ये सुध्दा आपण HIIT करू शकतो. ह्या व्यायाम प्रकारचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, कमी वेळामध्ये जास्त फायदा देणारा व्यायाम आहे. व्यायामाची तीव्रता वाढवली. किंवा जलद व्यायाम केला. तर आपल्याला कमी वेळामध्ये जास्त फायदा होतो. आपल्याकडे वेळ कमी असतो किंवा कधी कधी वातावरणामुळे म्हणा किंवा काही कारणांमुळे आपले नेहमीचे व्यायाम करता येत नाही. अशावेळी आपण घरच्या घरी HIIT चे व्यायाम करू शकतो.

HIIT व्यायामाची सुरुवात आपण उठाबशाने करणार आहोत. आपल्याला जेवढ्या वेगात करता येतील. तेवढ्या वेगात आणि जितक्या जास्त करता येतील. तितक्या जास्त उठाबशा एका मिनिटात आपल्याला करायच्या आहेत. सलग एक मिनिटासाठी उठाबशा केल्यानंतर आपण थकून जातो. त्यानंतर ९० सेकंदासाठी विश्रांती घ्यायची आहे. ही विश्रांती झाल्यानंतर आपण लगेच पुढचा व्यायाम सुरू करतो. हा म्हणजे स्टार जंप. स्टार जंप म्हणजे जागच्या जागी उड्या मारायच्या. आपण जितक्या जोरात आणि जितक्या वेगाने जास्त उड्या मारू. तेवढे छान आहे. एका मिनिटासाठी हा व्यायाम केल्यानंतर आपण परत ९० सेकंदासाठी पुन्हा विश्रांती घेतो. ही विश्रांती झाल्यावर आपण तिसरा व्यायाम सुरू करतो. तो म्हणजे जागच्या जागी धावणे. एका मिनिटात जितक्या जास्त जोरात धावू तितके छान. त्यानंतर आपण पुन्हा ९० सेकंदासाठी विश्रांती घेतो. अशा पध्दतीने आपण एका-एका मिनिटाचे पाच व्यायाम करतो, आणि या प्रत्येक व्यायामामध्ये ९० सेकंदांचा विश्रांतीचा वेळ असतो. अशा पध्दतीने HIIT व्यायाम करावा.
(खाली दिलेल्या लिंकवर जाऊन व्हिडिओ सुद्धा पाहू शकता)