आपले ब्लडप्रेशर कमी झाले, तर आरोग्याला धोका पोहोचू शकतो का ? ब्लडप्रेशर कमी होण्यापासून कसे वाचावे, यासाठी वारंवार विचारणा केली जाते. आज आपण ब्लडप्रेशर कमी असणे ही संकल्पना समजून घेऊया.
ब्लडप्रेशर हे सामान्यपणे १२० बाय ८० म्हणजेच वरचं बीपी १२० आणि खालचं बीपी ८० असले पाहिजे. १२० च्यावर बीपी असेल तर त्याला आपण ‘उच्च रक्तदाब’ असे म्हणतो. जर बीपी ९० ते ८० म्हणजे वरचं बीपी ९० आणि खालचं बीपी ८० असेल, तर त्याला आपण ‘कमी रक्तदाब’ असे म्हणतो.

एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब नेहमी मोजल्यावर कमी दिसतो. ब्लडप्रेशर थोडं कमी असेल तर त्या व्यक्तीला काही त्रास आहे का ? तसेच त्याच्या वैद्यकीय तपासण्या कशा आहेत. एखादी व्यक्ती पूर्ण निरोगी आयुष्य जगत असेल. वैद्यकीय व शारीरिक तपासण्या नॉर्मल असतील. तर त्याच ब्लडप्रेशर कमी असेल त्याला आपण सामान्य ब्लडप्रेशर असे मानतो.
एखाद्या व्यक्तीचे बीपी नेहमी थोडं जास्त राहत असेल. आणि अचानक बीपी कमी झाला. तर मात्र ते काळजीचं कारण ठरू शकतं. आपलं ह्रदय, रक्तवाहिन्या आणि रक्ताचं प्रमाण यावरुन आपले ब्लडप्रेशर ठरत असते. यांच्यामध्ये दोष निर्माण झाल्यावर ब्लडप्रेशर कमी होऊ शकते. व्यक्तीला त्रास होत असेल. त्याचं ब्लडप्रेशर कमी झालं. तर हे धोक्याचं लक्षणं असू शकतं. आपल्याला तातडीची वैद्यकीय मदत घ्यावी लागते. दम लागणे, छातीत दुखणे, भोवल येणे, अस्वस्थ वाटणे अशी लक्षणं दिसून आल्यास त्वरीत वैद्यकीय मदत घ्यावी.

ब्लडप्रेशर कमी होण्यामागे वेगवेगळे आजार असू शकतात. ह्रदयाच्या झडपा खराब होणे, ह्रदयविकाराचा झटका, ह्रदयाची गती अनियमित होणे. अशा वेगवेगळ्या आजारांमध्ये ब्लडप्रेशर कमी होऊ शकतो. याच्याशिवाय एखादा जंतू संसर्ग झाला असेल. तसेच शरीर भर जंतू संसर्ग पसरला असेल. शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होणे. रक्तस्त्राव होणे अशावेळी ब्लडप्रेशर कमी होऊ शकते.
व्यक्तीला भोवल येत असेल. अचानक बीपी कमी झाला. तर त्याला प्राथमिक उपचार कसा करायचा. अशा व्यक्तीला मोकळ्या ठिकाणी घेऊन जायचे. गर्दी टाळायची. पायाला सपोर्ट देऊन पाय वर उचलायचे. याने ह्रदयाकडे रक्त पुरवठा होतो. बीपी पूर्वरत होण्यास मदत होते.
( अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा. )