आज आपल्या समाजासमोर जीवनशैलीच्या आजारांचा फार मोठा प्रश्न आहे. डायबिटीस, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग आणि स्ट्रोक यासारखे आजार हे जीवनशैलीचे आजार आहेत. हे सगळे जुनाट आजार आपल्या जीवनशैलीमध्ये जर धोक्याचे घटक असतील तर त्यातून तयार होतात. आपला आहार चुकीचा असेल, व्यायाम करत नसू, जर आपली जीवनशैली बैठी असेल. आपली झोप नीट होत नसेल. सततचा आणि अखंड ताणतणाव असेल. तर या सगळ्या घटकांमधून हे आजार तयार होतात. आणि हे आजार तयार होण्याआधी आपल्या एक लक्षण दिसतं. हे लक्षण म्हणजे आपल्या शरीरात वाढलेली चरबी.

ही चरबी वाढली की सगळे आजार तयार होतात. चरबी वाढली हे कसं ओळखायचं. तर त्यासाठी दोन सोपे उपाय आहेत. एक म्हणजे वाढलेले वजन आणि दुसरं म्हणजे वाढलेला पोटाचा घेर. आपला बॉडी मास इंडेक्स २३ पेक्षा जास्त असेल किंवा पुरुषामध्ये पोटाचा घेर ९० सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल. आणि स्त्रीयांमध्ये ८० सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल. तर आपल्याला जीवनशैलीचा आजार होण्याचा धोका मोठा असतो.

समाजामध्ये लठ्ठपणाचं आणि जीवनशैलीच्या आजारांचे प्रमाण खुप वाढलेलं आहे. त्यामुळे आपली चरबी आणि वाढलेले वजन कमी करणे हा सगळ्यांसमोरचं मोठं आव्हान आहे. हे वजन कसं कमी करायचं यासाठी बरेच उपाय आहेत. आपली मानसिकता आपण कसे वागतो. आपल्या सवयी यांचा सुद्धा आहारावर आणि जीवनशैलीवर मोठा परिणाम होत असतो. या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला छोट्या छोट्या टीप, काही महत्त्वाचे मुद्दे आणि काही बाबतीमध्ये सखोल ज्ञान असणं उपयोगी पडू शकतं. आरोग्य ज्ञानेश्वरी २०१८ चा विशेषांक आणि लठ्ठपणातुन सुटका हे एक छोटे पुस्तक दोन्ही गोष्टीमधून तुम्हाला माहिती मिळेल. काही बाबतीमध्ये अगदी सखोल माहिती दिलेली आहे. आणि काही अगदी छोटे-छोटे मुद्दे जे रोज उपयोगी पडतील असे देखील आहेत. तुम्ही सगळ्यांनी हा अंक वाचावा.
( खाली दिलेल्या लिंकवर जाऊन व्हिडिओ पाहा )