आपला आहार हा संतुलित असावा असे आपण नेहमीच म्हणतो. बॅलन्स डाइट हा आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे, असं तुम्ही ऐकलच असेल. पण हा संतुलित आहार कसा दिसतो हे आज आपण समजून घेऊया…
आपण लठ्ठ असलो किंवा आजारी असलो तर आपल्याला आहाराकडे लक्ष देण्याची गरज असते. पण एक लक्षात ठेवा. तुम्हाला कुठली ही औषध असली तर आहारामध्ये बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संतुलन म्हणजे काय?
आपल्या आहारामध्ये कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि इतर घटक योग्य प्रमाणात असायला हवेत. हे सगळे घटक असतील तर त्याला ‘संतुलित आहार’ असे म्हणता येते. आपण जे नेहमी खातो त्यात कर्बोदक आणि तेल याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे याला आपण संतुलित आहार म्हणू शकत नाही.
नाश्तामध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ टाळायला हवेत. प्रक्रिया केलेले पदार्थ नेहमीच वाईट असतात. त्यामध्ये साखर, मीठाचे प्रमाण जास्त, धोकादायक घटकांचे प्रमाण जास्त असतं. आपल्यासाठी जंकफूड वाईट आहे. त्यामुळे जंकफूड खाणं टाळले पाहिजे. आपल्या आहारात विविधता असली पाहिजे. वेगवेगळ्या रंगाची, चवीची फळं आणि भाज्या आहारात असायला पाहिजे. विविध घटक आहारात असल्यावर आतडीतील उपयुक्त जीवाणू वाढायला मदत होते.

नाश्ता निरोगी असायला हवा. आहारात पोळी व भात याचे प्रमाण कमी असायला हवे. कडधान्य, डाळी, दूध, दही यांचे प्रमाण असायला हवे. तसेच सलाद असायला हवे, असा आहार हा संतुलित आहार असतो. नाश्तासाठी कडधान्य, त्याच्या उसळी, नटस्, शेंगदाणे, फळं आणि सलाद यापैकी काहीतरी खाऊ शकतो. ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी भाकरी, भात व बटाटा यांचं प्रमाण कमी केलं तरी चालेल.
आपल्याला खाण्यामधून मधे-मधे ब्रेक घेणं आवश्यक आहे. सतत चरायला नको. दोन जेवणाच्यामध्ये उपास केला पाहिजे. याशिवाय शारीरिक हालचाल ही सुध्दा महत्त्वाची आहे. दिवसभर थोडीशी शारीरिक हालचाल केली तर त्याचा फायदा होतो. सतत बसल्याने धोका जास्त असतो. चालण्याने खूप फायदे होतात. चालण्यामुळे स्मृतीभ्रंश, डायबेटीस, ह्रदयविकार, संधीवात, डिप्रेशन यासारख्या आजारापासून सुरक्षितता मिळवता येते. आपण सगळ्यांनी आठ तास झोपण्याची गरज आहे. आठ तासापेक्षा झोप कमी केली तरी ह्रदयविकार, डायबेटीस व लठ्ठपणा याचा धोका खूप वाढतो. आपण आपली प्रगती सतत तपासून पहावी.

(खाली दिलेल्या लिंकवर जाऊन युट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ सुध्दा पाहू शकता.)