दर आठवड्याला दोन ते तीन पेशंट असे येतात. सर आमचे बीपी का तपासता? आम्हाला शुगर चेक करायला का सांगता? मला तर काहीचं लक्षणं आहे? ब्लड प्रेशर आणि मधुमेह हे आजार जीवनशैलीचे आजार आहेत. यांना ‘सायलंट किलर’ असे म्हणतात. या आजारांना सायलंट किलर का म्हणतो? कारण यांची कुठलीही लक्षण दिसतं नाही. कुठलीही चाहूल लागत नाही. अचानकपणे गुंतागुंतीचे आजार होतात. त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो.

उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे आपल्यासाठी हानिकारक का आहेत? हे आपण समजून घेतले पाहिजे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे खूप कालावधीसाठी असेल तर त्याचा आपल्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. मग रक्तवाहिन्या खराब होतात. मेंदूची रक्तवाहिनी खराब झाली तर पॅरॅलिसिस किंवा स्ट्रोकचा आजार होऊ शकतो. ह्रदयाची रक्तवाहिनी खराब झाली, तर ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो. डायबेटीस जर खूप कालावधीसाठी असेल तर त्याने दृष्टी जाते. त्याच्यानंतर किडनी खराब होऊ शकते. कधी कधी नसांवर परिणाम होतो. तर हे जे सगळे आजार होतात, त्याला गुंतागुंतीचे आजार असे म्हणतात.

अचानक उच्च रक्तदाब किंवा मधुमेह वाढला, तर त्याने ही त्रास होऊ शकतो. पण बहुतांशी त्रासांचा हा अधिक कालावधीसाठी आपल्या शरीरावर परिणाम करत असतात. आपण जर लवकर निदान केले तर हे गुंतागुंतीचे आजार कमी होतात. डायबेटीसची पहिली पायरी असेल किंवा प्री हायपर टेंशन असेल. यामध्ये जर जीवनशैलीत बदल केले तर दोन्ही आजार नियंत्रणात येऊ शकतो. काही लोकांना सौम्य त्रास असेल तर जीवनशैलीत बदल केल्यामुळे खूप फरक पडतो. त्यांचा आजार वाढत नाही. म्हणून आपल्याला त्रास असो किंवा नसो तरी योग्यवेळी तपासण्या केल्या पाहिजे. वर्षातून एकदा तरी शुगर आणि ब्लड प्रेशर तपासून घ्यावं.

( खाली दिलेल्या युट्यूब चॅनेल लिंकवर जाऊन व्हिडिओ पाहू शकता)