सीएसआयआर या संस्थेने एक सर्व्हे केला. त्या सर्व्हेबद्दल एक बातमी व्हायरल झाली होती. धुम्रपान केल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. याच्याशिवाय शाकाहारी लोकांना आणि ओ रक्तगटवाल्यांनाही धोका कमी असतो, असे बातम्यांमध्ये सांगण्यात आले होते.
स्मोकिंगचा पुरस्कार करणारे लोकांनी या बातमीला मोठ्या प्रमाणात व्हायरल करत होते. आम्ही अशा कुठल्याही प्रकारची प्रेस रिलीज दिलेली नाही आहे, असे सीएसआयआर संस्थेने त्यांच्या वेबसाईटवर नोटीस लावली होती. तसेच त्यांच्या अभ्यासातला एक मजकूर देखील त्यांनी माहितीसाठी नमूद केला होता.

आहारामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असेल, काही न्युट्रीयन्स घटक जास्त असतील. तर त्याच्यामुळे आपल्या शरीराला फायदे होतो. त्यामुळे कदाचित शाकाहारी लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसलेला नाही, असे असू शकते असं संस्थेचे म्हणणे होते. धुम्रपान करणाऱ्या लोकांना हा धोका कमी असतो असं काही अभ्यासामध्ये दिसले आहे. परंतु ते धुम्रपान केल्यामुळे असं नाही. धुम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये अँटिबॉडीज् कमी दिसलं. पण धुम्रपान केल्याने कोरोना होत नाही, असं मुळीच नाही. असं त्या पेपरमध्ये स्पष्ट लिहिले आहे.

एखाद्या आजाराविरुध्द अँटिबॉडीज् तपासून बघतो. तर रोगप्रतिकारशक्तीवर अवलंबून असतं. शरीर किती प्रमाणामध्ये अँटिबॉडीज् तयार करतं. एखादी व्यक्ती धुम्रपान करत असेल, तर त्याची रोगप्रतिकारशक्ती खराब झालेली असू शकते. त्याच्यामुळे अँटिबॉडीज् रिस्पोन्स कमकुवत झालेला असू शकतो, हे सुध्दा कारण असू शकते. संस्थेने हा सर्व्हे सर्व सामान्यांसाठी तयार केलेला नव्हता. सर्व्हेमधुन मोठाले निष्कर्ष कधी काढले जात नाही. त्यामुळे आपण थोडेसे समजून घ्यायला हवं. अशा खोट्या बातम्यांना बळी पडू नका. कोरोनापासून बचाव करायचा असेल, तर धुम्रपानाचा मार्ग स्विकारू नका.
(खाली दिलेल्या युट्यूब चॅनेलच्या लिंकवर जाऊन व्हिडिओ सुध्दा पाहू शकता)