सध्या कोरोनाची साथ सुरू आहे. काही लोकांना गंभीर स्वरुपाचा आजार होतो. आपला आजार हा गंभीर आहे की सामान्य आहे हे कसं ओळखायचं. याच्याविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तसेच गंभीर कोरोनाची लक्षणं काय? हे आपण समजून घेऊया.
आपल्याला माहित आहे की, काही लोकांना सौम्य प्रकारचा कोरोना होतो आणि ते लगेच बरे सुध्दा होतात. हे बहुतांशी लोकांमध्ये घडतं. काही रुग्णांना तर ती लक्षण सुध्दा येत नाहीत. तर काही लोकांना गंभीर स्वरुपाचा आजार होतो, याची लक्षणं काय आहेत?

आपल्याला तीव्र स्वरुपाची लक्षणं असणे. म्हणजे ताप येत असेल तर खुप जास्त ताप येतोय का? किंवा तो कमीच होत नाही. अंगदुखी, थकवा अगदी प्रचंड आला आहे. आपल्याला पलंगावरून उठणं सुध्दा होत नाही. अशा स्वरुपाचा त्रास असेल तर ते गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. अगदी गंभीर लक्षणं असं नाही. परंतु अशाप्रकारची लक्षण दिसून आल्यास त्याच्यावर दुर्लक्ष करून चालणार नाही.
दम लागणे किंवा धाप लागणे? म्हणजे काय तर आपला श्वासोच्छावास जोरात चालतो किंवा आपण श्वास घेतोय ही भावना स्वतःला जाणवायला लागणे. नेहमी आपण श्वास घेतो हे जाणवत नाही. तसेच समोरची व्यक्ती असते तेव्हा तिला ही जाणवत की हा जोर जोरात श्वास घेतोय. यालाच आपण दम लागणे किंवा धाप लागणे असं म्हणतो. ही गंभीर स्वरुपाच्या आजाराचे लक्षण असतं. अशाप्रकारची लक्षण दिसू लागली तर त्वरीत डॉक्टरांना दाखवायला हवं. काही कोरोना पेशंटमध्ये फारसा त्रास होत नाही, पण त्यांना अशक्तपणा जाणवत असतो. अशा व्यक्तीची ऑक्सिजनची पातळी तपासून पाहिली पाहिजे. ही तपासणी सर्वसामान्य व्यक्तीचं ९५ च्यावर असतं. जर आपल्या ऑक्सिजनची पातळी कमी होत असेल तर आपल्याला त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज असते. ९० च्या खाली गेलं तर तातडीने दवाखान्यात जाऊन ऑक्सिजनचा उपचार घेणे गरजेचे असते. समजा, एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची लक्षण दिसतं नसली आणि ऑक्सिजनची पातळी कमी असेल तर त्या व्यक्तीला गंभीर स्वरुपाचे लक्षण आहे, असं समजले जाते.

याच्याशिवाय काही तपासण्या असतात. आणि कोविडची जी तपासणी आहे, त्याच्यावरुन कोविड आहे का हे आपल्याला समजते. पण इतर ज्या तपासण्या आहेत, बाकी ज्या आपल्या शरीराचं वातावरण कसं आहे हे समजतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण ह्या तपासण्या करतो आणि हा आजार गंभीर आहे का हे समजतं. सीटी स्कॅन ही एक अशी तपासणी आहे, ज्याच्यामध्ये आपल्या फुफ्फुसामध्ये कितपत बाधा झालेली आहे हे लक्षात येतं. फुप्फुसामध्ये जास्त बाधा झाली असेल तर त्यामुळे हा आजार गंभीर स्वरुपाचा आहे, असे डॉक्टर सांगतात.
दम लागणे, छातीत दुखणे, पोटात तीव्र स्वरुपाचे दुखणे आणि सतत उलट्या होणे. याच्याशिवाय चक्कर येणे किंवा भोवळं येणे. जर असं काही झालं तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे. नेहमीचे काम करताना अचानक प्रचंड थकवा जाणवत असेल किंवा ते आपण काम करु शकत नसू याचा अर्थ आपल्याला जो त्रास होतोय. तो गंभीर स्वरुपाचा आहे. लघवीला कमी होणे, लघवी गडद पिवळ्या रंगाची होणे ही सुध्दा गंभीर आजाराची लक्षणं असू शकतात. लघवीला होतंच नाही हे जास्त गंभीर आजाराचे लक्षणं समजतो.

लहान मुलं सारखी चिडचिड करणं, झोपणं आणि रडणं हे सुध्दा गंभीर आजाराचे लक्षणं असू शकतं. लहान मुलं खाणं पिणं अगदी थांबवून टाकतात. अंगावरच पिणं आणि खाणं कमी करणं हे सुध्दा गंभीर स्वरुपाचं लक्षणं आहे. लहान मुलांना लघवी न होणे हे तितकेच घातक आहे. मोठ्या लोकांमध्ये सारखं झोपावसं वाटणं, गुंगी येणं, आहार खाण्याची बिल्कूल इच्छा न होणं. अशा लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करू नये. मोठ्या लोकामध्ये तीव्र डोकेदुखी आणि आकडी येणं हे सुध्दा गंभीर स्वरुपाचं लक्षण असू शकतं. ही काही लक्षणं दिसली तर याच्याकडे दुर्लक्ष करू नका.
( खाली दिलेल्या युट्यूब चॅनेलच्या लिंकवर जावून व्हिडिओ सुध्दा पाहू शकता )