कोरोना झाल्यानंतर काही पेशंटची शुगर वाढलेली दिसते. ज्यांना डायबेटीस नव्हता त्यांना सुध्दा डायबेटीसच्या रेंजमध्ये शुगर वाढलेली दिसून आली. तर असं का होतं? तर आपण थोडक्यात समजून घेऊया.

कोरोनाचा विषाणू हा आपल्या शरीरावर वेगवेगळ्या भागांवर हल्ला करतो. फुफ्फुसावर हल्ला केला तर फुफ्फुस खराब होतं. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी खालावते आणि हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागतं. याच्याशिवाय आपल्या मज्जापेशी, रक्तवाहिन्या, स्वादुपिंड यांच्यावर सुध्दा हा व्हायरस हल्ला करतो, असं अभ्यासांमध्ये दिसून आलेलं आहे. आपल्या स्वादुपिंडामध्ये बीटा पेशी नावाच्या पेशी असतात. त्या इन्शुलिन तयार करतात. आणि त्या शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. तर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव या पेशींवर होतो. त्याच्यामुळे त्याचं काम बिघडतं. आपली शुगर वाढते.

आपल्या शरीरामध्ये ताणतणाव वाढतो. ताणतणावाशी लढण्यासाठी जी स्ट्रेस हार्मोन्स असतात. ती सुध्दा आपल्या शरीरामध्ये वाढतात. आणि त्यांनी सुध्दा शुगरचं प्रमाण वाढतं. ज्यांना मध्यम व गंभीर तीव्रतेचा आजार झाला. अशा लोकांना आपण जी औषध देतो. तर या औषधांच्या साईड इफेक्टमुळे डायबेटीस वाढतो.
याच्यामध्ये लक्षणं काही दिसतं नाहीत. अगदी सौम्य लक्षणं दिसून येतात. थकवा वाढणे, अशक्तपणा वाढणे, तहान जास्त लागणे, अशी लक्षणं दिसून येतात. पण शुगर चेक केल्यावर वाटतं की आपली खरोखरच शुगर वाढलेली दिसते. शुगरच्या तपासण्या केल्यानंतर त्याचं निदान करणं सोपं जातं. असं जर नवीन डायबेटीसचं निदान झालं तर घाबरून जाऊ नका. बऱ्याचशा पेशंटमध्ये हा डायबेटीस लवकर बरा होतो.
( खालील युट्यूब लिंकवर जाऊन व्हिडिओ सुध्दा पाहू शकता. )