कोरोनाच्या काळात सर्वच जण वर्क फ्रॉम होम करत होते. तसेच आताही काही कोर्पोरेट कंपनीचे एम्प्लॉई घरातूनच काम करत आहेत. जे लोक घरुन काम करतात त्यांच्या आरोग्यामध्ये काही विशिष्ट समस्या आपल्याला दिसतं आहेत. वारंवार लोकं सांगतात की, आम्ही घरुन काम करत आहोत आणि वजन वाढलं आहे. काही लोकांना पाठीचे, मणक्याचे, मानेचे व कंबरेचे आजार सुरू झालेले आहेत. तसेच ज्यांना डायबेटीस आणि उच्च रक्तदाब असे आजार आहेत, त्यांचे आजार हे अनियंत्रित झाले आहेत. काहींना मानसिक दडपण सुध्दा आलेलं वाटतं. हे जे प्रोब्लेम आहेत हे का होतात आणि त्याच्यासाठी काय करता येईल हे आता बघुया.
सलग बसून राहणे हा महत्त्वाचा प्रोब्लेम आहे. लॉकडाऊनच्या आधीही लोक बसूनच काम करायचे. पण त्यावेळी लोक घरातून बाहेर पडायचे, चालायचे, ऑफिसमध्ये असताना ब्रेक घ्यायचे. त्यामुळे लोकांच थोडं फार चालणं-फिरणं व्हायचं. वर्क फ्रॉम होम करताना तुम्ही घरातल्या घरात असता आणि एकाच ठिकाणी असता. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, सतत बसून राहणं हे धुम्रपानापेक्षा धोकादायक आहे.

सलग बसल्यामुळे आपल्या स्नायूंवर विपरित परिणाम होतो. त्यांची कार्यक्षमता कमी होते. सोबतच शरीरातील हार्मोन्स आणि रसायन यांच्यावर सुध्दा परिणाम होतात. सलग बसून राहिल्यामुळे इन्शुलिन रेसिस्टंट वाढतो. ही डायबेटीसची पहिली पायरी असते. याच्याशिवाय रक्तदाब वाढणे, ह्रदयविकार, अगदी कॅन्सरचा धोका सुध्दा वाढतो. हे सगळे परिणाम सतत बसल्यामुळे होतात. त्याच्यावर उपाय काय? तर सतत बसायचं नाही. सलग अर्ध्या तासापेक्षा जास्त बसायचं नाही. अर्धा तास झाला की जागेवरुन उठून शारीरिक हालचाल करायची. आपल्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते. आपलं आरोग्य सुधारतं. याच्याशिवाय नियमित व्यायाम जरी केला तरी फायदा होतो. व्यायामाचा फायदा हा आजारापासून बाहेर पडण्यासाठी होतो.

व्यायामामुळे आपले मसल्स मजबूत होतात. त्याच्यामुळे मणक्याला आधार चांगल्या प्रकारे मिळतो. आपले पोश्चर ठीक आहे ना. पाठीला, मानेला व्यवस्थित सपोर्ट मिळतो आहे ना? आपल्या हातांना व्यवस्थित सपोर्ट मिळतो आहे का? कॉम्प्युटरची उंची व्यवस्थित आहे का? हे तपासून बघणं गरजेचे आहे. याच्याशिवाय झोपेकडे दुर्लक्ष हा सुध्दा आरोग्यासाठी खूप हानिकारक विषय आहे. घरुन काम करत असताना कामांच्या तासांवर नियंत्रण राहत नाही. त्याच्यामुळे झोपेवर विपरित परिणाम होतो. कोणतीही स्क्रीन ही संध्याकाळच्या वेळेला बघितली. तर त्याच्यातून येणारी निळी किरणं ही मेंदूला उत्तेजित करतात. त्याच्यामुळे झोप आपली खराब होते.
संध्याकाळच्या वेळेमध्ये स्क्रीनवरचं काम टाळावं. जेवढं काम दिवसभरामध्ये करून घेऊ, तेवढं चांगलं असतं. जर संध्याकाळी स्क्रीनवर काम करावचं लागलं तर काही स्क्रीनवर फिल्टर येतात. ती वापरावीत. त्याने झोप सुधारू शकते. झोप हा आरोग्याचा मुलभूत पाया आहे. आणि आरोग्य सुधारायला मदत होईल.
( खाली दिलेल्या युट्यूब चॅनेलच्या लिंकवर जाऊन व्हिडिओ सुध्दा पाहू शकता )