सारकोपेनिया म्हणजेचं ‘स्नायूंची कमतरता’. तर या विषयावरची माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या आरोग्यासाठी स्नायू हे फार आवश्यक आहे. आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. वजन उचलतो आणि शारीरिक कामे करतो. याच्यासाठी स्नायूंची मदत होते. पण याच्यापेक्षा मोठं कार्य आपल्या शरीरात स्नायू करत असतात.
आपल्याला जीवनशैलीच्या आजारांपासून दूर ठेवणे. शरीरातील हार्मोन्सचं संतुलन व्यवस्थित राखून ठेवणं. याशिवाय आपलं जीवनमान वाढविणे, अशी महत्त्वाची कार्य स्नायू करत असतात. स्नायू हे साखर शोषून घेणारे स्पंच आहेत. म्हणून ज्यांचे स्नायू बळकट असतात त्यांना डायबेटीस होत नाही.
पण वयाच्या तीशीनंतर किंवा चाळीशीनंतर हे स्नाय़ू हळूहळू कमी व्हायला लागतात. आपल्या शरीरातील हार्मोन्स हे स्नायूंना पुरक असतात. तारुण्यांचे हार्मोन्स असतात ते कमी होतात. जसजसे वय वाढतं जातं, तसतसे स्नायू कमी व्हायला लागतात. तसेच वयाच्या ६० नंतर झपाट्याने हे स्नायू कमी होत असतात. यालाच इंग्रजीमध्ये ‘सारकोपेनिया’ असे म्हणतात.

सारकोपेनियामध्ये वाढत्या वयासोबत इतर काही आजारांबरोबरच स्नायू झपाट्याने कमी होतं असतात. यातले काही घटक हे तुमच्या जीवनशैलीशी सुध्दा संबंधीत आहेत. म्हणजे तुमची बैठी जीवनशैली, व्यायामाची कमतरता असेल. याशिवाय तुमचा आहार चुकीचा असेल. प्रथिने योग्य प्रमाणात घेत नसाल. संतुलित आहाराचा अभाव असेल. तर तुम्हाला स्नायू झपाट्याने कमी होण्याचा त्रास होऊ शकतो. आपण याला जेव्हा वैद्यकीय दृष्ट्या बघतो. तर याचे दोन पैलू आहेत. पहिला पैलू म्हणजे स्नायूंचा आकारमान कमी होणे. दुसरा पैलू म्हणजे त्याचं काम करणचं कमी होणे. हे दोन्ही घटक असतील तर त्याला आपण सारकोपेनिया असे म्हणतो. तर डेक्झा स्कॅन वापरून स्नायूंचा आकारमान मोजू शकतो. स्नायूंचा आकारमान कमी झाला असेल तर त्याला सारकोपेनिया असे म्हणतात. याच्याशिवाय स्नायूंची कार्यक्षमता सुध्दा मोजता येते. हातांची ताकद मोजू शकतो. हातांची ताकद त्या मशीनवर कमी येत असेल तर त्याला आपण सारकोपेनिया असे म्हणतो.
तसेच तुम्ही किती फास्ट चालू शकता हेही मोजू शकतो. चार मीटर चालायला सांगायचे. चालत असताना स्पीड मोजायचा. ०.८ मीटर पेक्षा कमी चालत असाल तर आपण असं समजायचं चालण्याचा स्पीड कमी झालेला आहे. आणि हे सारकोपेनियाचे लक्षण असू शकतं.

खऱ्या आयुष्यामध्ये आपण कसं तपासू शकतो. तर आपल्याला लक्षणावरून कळतं. एखाद्याची शारीरिक क्षमताचं कमी झालेली आहे. त्याच्याकडून पटकन उठ-बस होत नाही. नेहमीची काम अतिशय कमी गतीने होतात. तर त्याच्या मागे सारकोपेनिया हे कारण असू शकतं. एखाद्या व्यक्तीचं वजन नॉर्मल असू शकतं. वजन थोडं वाढतं. पण त्याच्या स्नायूंची कमतरता झालेली असते. त्यांच्या स्नायूंची झीज झालेली असते. चरबी वाढलेली असते. चरबी वाढल्यामुळे ती व्यक्ती वरुन आपल्याला सामान्य दिसते. याला इंग्रजीमध्ये सारकोपेनिया ओबेसीटी असे म्हणतात. म्हणजेच स्नायूंच्या कमतरतेमुळे आलेला लठ्ठपणा असे म्हणतात. हे जे आहे ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. तसेच हे बऱ्याचशा आजारांशी संलग्न असतं. याच्यामुळे आपल्याला ह्रदयरोग आणि जीवनशैलीचे विविध रोग मागे लागू शकतात. लवकर थकून जाणे तसेच लवकर मृत्यू येऊ शकतो. या गोष्टी स्नायूंच्या कमतरतेमुळे होऊ शकतात.
या आजारावर वैद्यकीय औषधे अशी काही फारशी नाही आहेत. यामध्ये जीवनशैलीतील काही गोष्टी आपण करु शकतो. रोज व्यायाम करणे. यामध्ये स्नायूंना बळकटी देणारे जे व्यायाम असतात. तसेच योगासनामधली आसनं असतात. याशिवाय कवायतीचे प्रकार असतात. वजन उचलण्याचे व्यायाम असतात. हे जे स्नायू बळकट करणारे व्यायाम असतात, त्याने खूप फायदा होतो. तरुणांनी व्यायामाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.

व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर स्नायूंच्या कार्यक्षमतेमध्ये वाईट परिणाम होतो. पुरेशा प्रमाणात शरीरात व्हिटॅमिन डी असेल तर त्याच्यामुळे फायदा होताना दिसून येतो. ज्येष्ठ लोकांमध्ये दात पडल्यावर ते ठरावीकचं खाद्य खायला लागतात. त्यामुळे बऱ्याचशा आहार घटकांची आणि मायक्रो न्यूट्रीयन्स असतात. त्यांची सुध्दा कमतरता भासू लागते. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण लोह, मायक्रो न्यूट्रीयन्स यांची काही कमतरता असेल तर ती देखील पूर्ण करू शकतो. हे सगळं केल्याने स्नायूंचे आरोग्य वाढण्यासाठी मदत होते. सर्वांनी आपल्या स्नायूंच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं.
( खाली दिलेल्या युट्यूब लिंकवर जाऊन व्हिडिओ पाहू शकता. )