जसा हार्ट अँटक असतो तसाच ब्रेन अँटक असतो, त्यालाच आपण पॅरॅलिसीस किंवा अर्धांगवायू (लकवा) असे सुध्दा म्हणतो. ब्रेन अँटकमध्ये मेंदूचा काही भाग निकामी झालेला असतो. मेंदूचा तो भाग बंद पडला, तर मेंदूचे त्या भागातील काम बंद पडतं. जसा हार्ट अँटक अचानक येतो. तसाच ब्रेन अँटक हा अचानक येत असतो. परंतु ब्रेन अँटक येईल, त्यावेळेला वेदना होतील असं नाही आहे.
दोन प्रकारे प्रोब्लेम होऊ शकतो. हा आजारमुळात मेंदूचा आजार नसुन रक्तवाहिन्यांचा आजार आहे. आपल्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांचा आजार म्हणजे स्ट्रोक होय. रक्तवाहिनीमध्ये गुठली झाली तर मेंदूला होणारा रक्त पुरवठा बंद पडतो. मेंदूच्या तेवढ्याच भागाला रक्त मिळत नाही. तो भाग तेवढा मृत पावतो. कुठल्याही रक्तवाहिनीला रक्तपुरवठा झाला नाही तर ती रक्तवाहिनी मृत होते. परिणामी त्या निकामी होऊन जातात.

रक्तवाहिनी कधी कधी फुटते. यामध्ये पण दोन ते तीन प्रकार आहेत. एक तर ती रक्तवाहिनी आजारी पडू शकते. ती रक्तवाहिनी खराब होते. खराब रक्तवाहिनी फुगते, फुगल्यावर ती फुटते आणि तिथून रक्तस्त्राव होतो. तर मेंदूमध्ये रक्तस्त्राव सुध्दा होऊ शकतो. प्रत्येकाला पॅरॅलिसिस किंवा स्ट्रोक होत नाही. ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे. त्यांना जास्त धोका असतो. एखादा आजार आहे, समजा, डायबेटीस आहे. त्यांना रक्तवाहिन्यांचे आजार होण्याचा धोका जास्त आहे.
उच्च रक्तदाब जास्त वाढला असेल तर त्यांना स्ट्रोकचा धोका असतो. ह्रदयाची गती कमी झाली तर ह्रदयामध्ये रक्ताची गाठ होण्याचा धोका जास्त असतो. तर ही गाठ वरती सरकून मेंदूपर्यंत जाऊ शकते. म्हणून अशा व्यक्तींना स्ट्रोकचा धोका जास्त असतो. जसंजसं वय वाढतं जातं तसंतसं स्ट्रोकचा धोका वाढत जातो.

मेंदू हा शरीरातील प्रत्येक अवयवांवर नियंत्रण ठेवत असतो. स्ट्रोक आल्यावर हाताचे व पायाचे काम बंद पडते. पॅरॅलिसिसवर काम करणाऱ्या संशोधकांना एक काम सोप्प केलं आहे. त्याला फास्ट (F.A.S.T) असे म्हणतात. एफ म्हणजे फेस, ए म्हणजे आर्म विकनेस, एस म्हणजे स्पीच आणि टी म्हणजे टाईम टू कॉल फॉर हेल्प. तुमच्या चेहऱ्याची एक बाजू वाकडी झाली आहे का? हातामध्ये विकनेस येणे. कधी कधी बोलण्यामध्ये अडथळा येतो. जर अशी लक्षणं दिसून आली तर त्या व्यक्तीला त्वरित मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलविले पाहिजे.
काही लोक विचित्रपणे वागायला लागतात. तर हे पण कधी कधी स्ट्रोकचं लक्षणं असू शकतं. चक्कर येणं हे देखील एक कारण असू शकतं. कधी कधी स्ट्रोक मोठ्या प्रमाणात आला तर व्यक्ती बेशुध्द पडतो. कधी साखरेची पातळी खूप कमी होते. असं झाल्यास स्ट्रोकसारखी लक्षणं येतात. तसेच काही औषधांचा ओव्हर डोस होतो. विषबाधेमुळे सुध्दा स्ट्रोक येऊ शकतो. काही बाकीचे आजार असतात. ते सुध्दा स्ट्रोक सारखी लक्षणं देतात.

स्ट्रोकचा उपचार हा दोन वेगवेगळ्या पध्दतीने करावा लागतो. एक म्हणजे औषधांच्या मार्फत दुसरा म्हणजे इंटरव्हेशन/सर्जरी सुध्दा करावी लागते. रक्ताची गुठली झाली असेल, तर त्या रुग्णाला रक्त पातळ करणारी औषधे दिली जातात. यात पेशंट वेळेच्या आधी आला तरच औषधे दिली जातात. परंतु त्या पेशंटला सर्पोटिव्ह ट्रीटमेंट देणे आवश्यक असते. यामध्ये मेंदूचे आजार खूप वाढू शकतात. त्यामुळे वेळेवर उपचार घेणे आवश्यक असते.
जेव्हा पेशंट धोक्याबाहेर येतो. तेव्हा त्यांच्या मेंदूला झालेल्या इजेतून बरे व्हायला वेळ लागतो. फिजिओथेरपी स्ट्रोकसाठी महत्त्वाची आहे. पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) हे देखील गरजेचे आहे. स्ट्रोक नंतर आलेला विकनेस हा पूर्णपणे बरा करणारे रामबाण औषध उपलब्ध नाही.
( खाली दिलेल्या युट्यूब लिंकवर जाऊन व्हिडिओ सुध्दा पाहू शकता. )