काही लोक डायबेटीसची औषधे नेहमी घेत असतात. तरीही शुगर लेव्हल वाढलेली दिसते. मग असे लोक आम्हाला प्रश्न विचारतात. औषधे घेऊन सुध्दा शुगर का वाढते? या विषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया.
आपल्याला साधारण टाईप २ डायबेटीस दिसतो. टाईप २ डायबेटीस जीवनशैलीशी संबंधीत आजार आहे. आहार चुकीचा असेल, व्यायामाचा अभाव असेल, अपुरी झोप आणि बैठी जीवनशैली असेल आणि सततचा ताणतणाव असेल. तर हे घटक कारणीभूत ठरतात. तसेच लठ्ठपणा हा देखील धोक्याचा घटक आहे. हे घटक जर जीवनशैलीत असतील तर त्याच्यामुळे डायबेटीसचा धोका वाढतो. आणि ह्याच कारणामुळे आपल्याला डायबेटीस होत असतो.

इन्शुलिनच्या कार्याला प्रतिकार हे व्यक्तीच्या शरीरामध्ये तयार होत असतात. त्याच्यामुळे आपल्या शरीरातील इन्शुलिन नीट काम करत नाही. इन्शुलिनची पातळी वाढायला लागते. काही काळानंतर आपल्या शरीराला वाढलेली इन्शुलिनची पातळी टिकवायला कठीण जाते. इन्शुलिनचा दर्जा कमी खराब होतो आणि पातळी कमी व्हायला लागते. अशा वेळी पेशंटची शुगर अनियंत्रित होते.
जीवनशैलीत बदल केले नाही तर हा आजार वाढत जाणारा आहे. नैसर्गिक प्रक्रिया ही जीवनशैलीमधून उत्पन्न होते. सध्या जीवनशैली खूपच धकाधकीची झाली आहे. त्याच्यामुळे जीवनशैली बदल आणि वजन कमी करणे शक्य होत नाही. जर पेशंटला सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचा आजार सौम्य असतो. त्यांची रक्त शर्करा नियंत्रणात राहते आणि हळूहळू वाढत जाते. पुढे ही रक्त शर्करा अनियंत्रित होते, त्यासाठी औषधे द्यावी लागतात. नैसर्गिक प्रक्रिया वाढतं जाणे हेच महत्त्वाचे कारणं आहे, औषधे घेऊन सुध्दा साखर नियंत्रणात न राहण्याचं.

टाइप १ डायबेटीस हा वेगळ्या प्रकारचा डायबेटीस आहे. यामध्ये सुध्दा इन्शुलिनची गरज असते. इन्शुलिन पुरेशा प्रमाणात दिले गेले नाही तर शुगर वाढते. जेव्हा ही औषधे घेऊन सुध्दा शुगर वाढलेली दिसत असेल, तर यावेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे. औषधे योग्य सुरू असतात. पण जीवनशैलीतला एखादा घटक विस्कळीत झाला, तर शुगर लगेच वाढू शकते. जीवनशैलीतील व्यायाम हा घटक कोणत्या ना कोणत्या कारणाने बंद पडू शकतो. तर अशावेळी आपण छोट्या छोट्या टप्प्यातील व्यायाम करू शकतो.
तसेच काही लोकांना आहार हा थोडा थोडा वाढत जातो. तर त्याने औषधे घेऊन सुध्दा शुगर वाढते. गोड खाल्ल्याने शुगर वाढते हा गैरसमज आहे. अतिरिक्त प्रमाणामध्ये कर्बोदकामुळे ही शुगर वाढू शकते. वजन वाढल्यामुळे सुध्दा रक्त शर्करा वाढते. लोकांना काही आजार होतात, त्यावेळी स्ट्रेस हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. तर त्यामुळे सुध्दा रक्त शर्करा वाढू शकते. लोक औषध आणि डॉक्टरांचा फॉलोअप ठेवत नाही. त्यामुळे सुध्दा शुगर वाढते. काही पेशंट वर्षभर शुगरची तपासणी करत नाही. त्यामुळे सुध्दा शुगर वाढू शकते. आपल्याला शुगर पातळीवर बारीक नजर ठेवावी लागते. दर दोन महिन्याने शुगर तपासून पाहिली पाहिजे. तर चार महिन्याने एचबीएवनसीची तपासणी करावी. तर ही काही महत्त्वाची कारणे आहेत.
( खाली दिलेल्या युट्यूब लिंकवर जावून व्हिडिओ सुध्दा पाहू शकता. )