आज आपण ह्रदयविकार, स्ट्रोक हे कसे टाळायचे हे समजून घेऊया. पॅरॅलिसिस किंवा हार्टअँटकसाठी रिस्क फॅक्टर तसेच धोकादायक घटक काय? हे आज आपण जाणून घेऊया.
धोकादायक घटक म्हणजे वेगळे काही नसून आपल्या जीवनशैलीतील काही घटक आहेत. ज्यांच्यामुळे हार्टअँटक व स्ट्रोक वाढण्याची रिक्स वाढते. जसं आपण अंधारात गाडी चालवत असू आणि गाडीला लाईट नसेल तर अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे १०० टक्के अपघात होईल असं नाही. परंतू रिस्क वाढते. तसेच हे घटक आपल्या आयुष्यात असतील तर याच्यामुळे रिस्क वाढते.
तुमचं वय, अनुवांशिक घटक, बीपी, डायबिटिस, लठ्ठपणा, आहार, धुम्रपान हे रिस्क फॅक्टर आहेत. आपल्या जीवनशैलीत सामावून गेलेले असतात. याच्यामुळे ह्रदयविकार कसा होतो. याची माहिती आपण घेऊया.

हे रिस्क फॅक्टर कितपत धोका करू शकतात. ह्यासाठी फ्रेमिंगहॅम हार्ड स्टडी यांनी एक स्कोर तयार केला आहे. याशिवाय क्यूरीस्ट टू नावाचं स्कोर (चाचणी) उपलब्ध आहे. ही चाचणी कशी असते. हे आपण आता जाणून घेऊया.
आपल्या मोबाइलवर गुगलमध्ये क्यूरेस्ट २ कॅलक्यूलेटर टाइप केल्यावर हा कॅलक्यूलेटर उघडता येतो. आता आपण साधारण ५० वर्षीय भारतीय पुरुषांचे उदाहरण घेऊया. ज्याला डायबिटीस आहे, तो साधारण दिवसाला १० सिगरेट पितो. या व्यक्तीला टाईप २ डायबिटीस आहे. उंची ही साधारण १६० सेंटीमीटर आणि वजन १०० किलो असलेल्या पुरुषांचे पुढील १० वर्षांचे रिक्स बघुया. या व्यक्तीला २६ टक्के रिक्स आहे, पुढच्या १० वर्षात हार्टअँटक किंवा पॅरॅलिसिसचा अँटक येण्याची. परंतु व्यसन कमी केले आणि वजन कमी केल्यावर ही रिस्क कमी कमी होत येते.

तुम्ही जेव्हा तुमच्या डॉक्टरांकडे जाता. तुम्हाला तपासून, रिक्स कॅलक्यूलेट करून त्याप्रमाणे औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदल सांगतात. हे जर औषधोपचार नियमितपणे घेतले. तर तुमचे पॅरेलिसिस किंवा हार्ट अँटकची रिक्स कमी होते. तर अशा पध्दतीने तुम्ही तुमची रिक्स कॅलक्यूलेट करून किंवा तपासून बघू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये ह्रदयविकार आणि पॅरॅलिसिस होण्याची किती शक्यता आहे. हे तुम्हाला स्वतः बघता येईल आणि जीवनशैलीत बदल करता येईल.