ह्रदयविकार किंवा स्ट्रोक हे मुळात रक्तवाहिन्यांचे आजार आहेत. रक्तवाहिनी आजारी व कडक होते. त्याच्या आतमधे चरबी आणि इतर घटक जमा होतात. आणि ती बंद पडायला लागते. अशा रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठण्याचा धोका जास्त असतो. अशा रक्तवाहिनीमधे रक्त गोठल तर पुढचा रक्त पुरवठा बंद पडतो. जर हे ह्रदयाच्या बाबतीत झालं तर ह्रदयविकाराचा झटका येतो. मेंदूच्या बाबतीत झालं तर त्याला आपण पॅरॅलिसीस किंवा स्ट्रोक असं म्हणतो. हे जे आजार आहेत यांचा धोका खरतर मोजता येतो.

तुम्ही इंटरनेटच्या ब्राऊजवर क्यूरीस्क३ असं टाईप केल्यावर तुम्ही त्या पेजवर जाता. त्यानंतर त्यात वय, लिंग आणि नागरिकत्व विचारलं जातं. भारतीय उपखंडातील लोकांना ह्रदयविकार व स्ट्रोकचा धोका जास्त असतो. व्यसन आहे का? डायबेटीस आहे का? घरामध्ये ६० वर्षांपर्यंत कोणाला ह्रदयविकार झाला आहे का? किडनी, उच्च रक्तदाब यासारखे आजार आहेत का? कोलेस्ट्रॉलचा रेशिओ? उंची वजन? अशा प्रकारची सर्व माहिती टाकल्यावर कॅलक्यूलेटर रिक्स नावाचं बटन असतं. त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला धोका किती आहे त्याचा आकडा समोर येतो.

काही गोष्टींवर नियंत्रण आणि जीवनशैलीत बदल केले तर हा धोका कमी असलेला दिसून येतो. आपण आपला धोका एकदा मोजून घ्या, तो जर जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.