Scroll to top

नियमित वैद्यकीय तपासणी


drvinayakadm - March 11, 2022 - 0 comments

आपल्याला काही तपासण्या नियमित करायला सांगतात. वयाच्या ३० शीनंतर ४० शीनंतर जीवनशैलीचे आजार होण्यास धोका जास्त असतो. म्हणून बऱ्याचदा डॉक्टर आपल्याला नियमित वैद्यकीय तपासण्या करायला सांगतात. तर या तपासण्या काय असतात? याच्या मागचं प्रयोजन काय असतं? हे आज आपण थोडक्यात समजून घेऊया.

    आपल्या शरीरातले बरेचशे प्रोब्लेम वरुन दिसत नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला आतमधली तपासणी करावी लागते. त्यासाठी नियमित वैद्यकीय तपासण्या आपल्याला मदत करतात. जे आजार आपल्याला सामान्यपणे दिसतात. त्यांचा धोका आपल्याला जास्त असतो. वयाच्या तीशी व चाळीशीनंतर जसं की जीवनशैलीचे आजार. यासाठी स्क्रीनिंग टेस्ट सुचवल्या जातात. याच्यामध्ये जर का काही दोष दिसले. तर आपल्याला सखोल तपासणी करता येते आणि काही आजार आहेत का त्याचं पटकन निदान करता येतं. जर निदान लवकर झालं तर उपचार पटकन करता येतात. म्हणून या टेस्ट आपल्याला सांगण्यात येतात.

Image Source – Unique News Online

    सीबीसी (कम्प्लिट ब्लड काऊंट) तपासणी – सीबीसी या तपासणी मध्ये आपल्याला शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे हे तपासलं जातं. हिमोग्लोबिन कमी असेल, तर मग आपल्याला लोहाची व विटामिनची कमतरता भासतेय का? किंवा इतर काही दोष लाल रक्तपेशींमध्ये आहेत का? हे तपासले जाते. याच्याशिवाय पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्याचं प्रमाण व्यवस्थित आहे की नाही. त्याचं स्वरुप आणि आकार कसा आहे, हे सुध्दा आपल्याला सीबीसी या तपासणीमध्ये कळतं.

    किडनी फंक्शन टेस्ट – याच्यामध्ये युरिया, क्रियायटिनी आणि इलेक्ट्रोलाइटस् ही जी द्रव्ये असतात. याचं प्रमाण कसं आहे हे आपल्याला या तपासणी मधून कळतं. किडनीचं (मुत्रपिंडाचं) काम कसं सुरू आहे. हे या तपासणी मधून याचा अंदाज आपल्याला येतो. बऱ्याचदा किडनीचे आजार असतात. कधी कधी काही औषधांचा परिणाम किडनीवर होत असतो. आणि त्याच्यामध्ये किडनीचं काम कसं सुरू आहे. हे या तपासणी मधून आपल्याला कळतं.

लिव्हर फंक्शन टेस्ट – लिव्हर फंक्शन टेस्ट मार्फत आपण लिव्हरची सुध्दा तपासणी करतो. लिव्हर काही इजा झाली असेल किंवा आजार झाला असेल. तर त्याच्यामध्ये जे काही घटक द्रव्ये असतात. ते कसे आहेत किती प्रमाणात आहेत हे आपल्याला लिव्हर फंक्शन टेस्ट मधून कळतं. 

Image Source – Internet

शुगर तपासणीसाठी आपल्याकडे दोन मार्ग आहे. एक म्हणजे आपण सरळ सरळ शुगरची पातळी आपल्या रक्तामध्ये किती आहे हे तपासतो. ती जरा उपाशी पोटी तपासली तर तिला फास्टिंग ब्लड शुगर लेव्हल म्हणतात. जेवण झाल्यावर दोन तासांनी तपासली तर त्याला आपण पोस्ट मिल ब्लड शुगर लेव्हल म्हणतात. ही जी तपासणी असते त्यात शुगर लेव्हल जास्त किंवा कमी झालेली कधी कधी दिसते.

पण याच्यापेक्षा चांगला अंदाज देणारी तपासणी असते ती म्हणजे एचबीएवनसी. शुगर लेव्हल आपण तपासतो तर त्या दिवसाचा अंदाज आपल्याला देते. एचबीएवनसी याच्यामध्ये आपल्या हिमोग्लोबिनला जे ग्लुकोज चिकटलेलं असतं. तर त्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये किती आहे, हे आपण बघत असतो. आणि त्याचं प्रमाण जर वाढलेलं असेल, तर त्यांनी आपल्याला अंदाज येतो की गेल्या तीन ते सहा महिन्यांमध्ये व्यक्तीच्या ब्लड शुगर लेव्हलचा अंदाज घेता येतो.

लिपिड प्रोफाईल तपासणी – याच्यामध्ये आपल्या शरीरामधले कोलेस्ट्रॉल आणि त्याच्याशी संबंधीत द्रव्ये ज्याला आपण लायपो प्रोटीन्स म्हणतो. तर ते आपण त्याच्यामधून तपासून बघत असतो. पॅरॅलिसिस, स्ट्रोक इत्यादींचा धोका जास्त की कमी आहे हे ठरवायला मदत होते. तर हा चांगला इंडिकेटर आहे.

Image Source – Pinterest

टीएसएच तपासणी – थायरॉइडचं आरोग्य कसं आहे, हे बघण्यासाठी टीएसएच नावाची तपासणी करतो. या तपासणी मधून थायरॉइड स्टिम्यूलेटिंग हार्मोन्सचं प्रमाण किती आहे हे कळलं, तर ते वाढलेलं आहे की कमी आहे. याच्यावरून आपल्याला थायरॉइडचा काही आजार आहे का? याचा अंदाज येतो.  

याच्याशिवाय आपण लघवीची देखील नियमित वैद्यकीय तपासणी करत असतो. लघवीमध्ये काही प्रोटीन जातयं का? शुगर जातयं का? काही इंफेक्शन आहे का? लघवी कशी दिसते? तर हे सगळं आपल्याला बघता येतं. तर या ज्या तपासण्या असतात. त्या तिशी व चाळीशीनंतर सुचवल्या जातात. याच्याशिवाय अनेक ब्लड टेस्ट आहेत. तसेच काही नवीन स्क्रीनिंग टेस्ट देखील येत आहेत. पण ह्या स्क्रीनिंग टेस्ट ह्या ठराविक लोकांसाठी असतात.   

Contact Us
close slider

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×
    %d bloggers like this: