झोप हा आपल्या जीवनशैलीचा अगदी महत्त्वाचा भाग आहे. तेवढाच दुर्लक्षित सुध्दा आहे. जर आपली झोप कमी झाली तर वेगवेगळे आजार आपल्या मागे लागतात. आपल्या सगळ्यांना कमीत कमी आठ तास झोपेची गरज असते. म्हणून आपण झोपेच्या कालावधीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला आठ तास झोप घेणे आवश्यक आहे.

किशोरवयीन मुलांना जास्त झोपेची गरज असते. जेव्हा आपण झोप पुर्ण करून उठतो, तेव्हा दिवसभर फ्रेश असायला हवं. दिवसभरामध्ये झोप यायला नको. जर आपण झोपायला संधी दिली तरी झोप यायला नको. आता झोपेचा दर्जा चांगला ठेवणं आवश्यक आहे. झोप ही सवयीनुसार बदलत असते. जर आपण झोपेच्या चांगल्या सवयी लावल्या. तर आपली झोप सुधारते आणि तिचा दर्जा सुध्दा सुधारायला मदत होते. यासाठी काय करता येईल?
तर दिवसा झोपू नये. दिवसा झोपलं की आपल्याला रात्रीची झोप येत नाही. रात्रीच्या झोपेचा दर्जा खराब होतो. संध्याकाळच्या वेळेमध्ये टीव्ही, मोबाइल इत्यादी स्क्रीन बघणं टाळायला पाहिजे. कारण या स्क्रीन मधला उजेड हा आपल्या डोळ्यामध्ये जातो. आणि मेंदूला उत्तेजित करतो. आणि त्याच्यामुळे रात्रीच्या झोपेचा दर्जा खालावतो.

चहा, कॉफी म्हणजेच कॅफिन असलेले पदार्थ घ्यायला नको. दुपारनंतर ही पेय घेऊन नये, कारण रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो. काही लोकांना सवय असते की, संध्याकाळच्या वेळेला भरपूर पाणी पितात आणि रात्री वारंवार उठावं लागतं. म्हणून संध्याकाळच्या वेळेमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नये. एकावेळेस झोपायची सवय लावा. तसेच आपण नियमित व्यायाम केला तर चांगली झोप यायला मदत होते. संध्याकाळच्या वेळेला पुस्तक वाचली तर मन शांत होतं आणि झोपही पटकन येते. झोपण्याच्या दोन तास आधी तरी जेवण झालेलं असावं. त्यांनी घशाशी येणं असे त्रास कमी होतात. ह्या गोष्टी आपण कराव्यात.