मॉर्डन मेडिसिनवर नेहमीच ही टिका होत असते की, मॉर्डन मेडिसिनचं जास्तीत जास्त लक्ष व भर औषधांनी उपचार करण्यावर आहे. पण मुळात हे खरं नाही आहे. मॉर्डन मेडिसिन हे आपला आहार, व्यायाम, जीवनशैली यावर बराचं भर देते. यावर रिसर्च सुध्दा होत असतो. खूप संशोधन या विषयावर घडतं असतं. आपण जर का बारकाईने लक्ष दिलं. आपल्याला नवीन नवीन मुद्दे मिळत असतात. ज्यांनी आपल्याला जीवनशैलीचे उपचार चांगल्या पध्दतीने करता येतात.
मला माईंड डाइट या विषयी वाचायला मिळालं. आणि आज ते मी तुमच्या सोबत शेअर करतोय. माईंड डाइट ही एक आहाराची पध्दती आहे. कमी आहार किंवा डायटिंग नसून एक वेगळी पध्दत आहे. आपल्याला या पध्दतीमध्ये काही पदार्थ जास्त प्रमाणात खायला सुचवलं जातं, तर काही पदार्थ हे टाळायला सुचवलं जातं. माईंड डाइट हा वयानुसार होणारा स्मृतीभ्रंश किंवा अल्झायमर आणि मेंदूचे झीज होणारे आजार आहेत, यांच्यामध्ये हा आहार खूप फायद्याचा ठरलेला आहे, असे विविध अभ्यासामधून दिसून आले आहे.

एक माईंड स्कोअर नावाचा स्कोअर त्यांनी तयार केला आहे. तुमच्या आहारामध्ये मेंदूला संरक्षण देणारे पदार्थ किती आहेत. आणि हानिकारक पदार्थ किती आहे, याच्यावरून माईंड स्कोअर मोजला जातो. माईंड स्कोअरचा परिणाम आपल्या मेंदूच्या आरोग्यावर कसा होतो. याविषयी बरेचसे अभ्यास झालेले आहेत. या अभ्यासातून दिलासादायक निकाल मिळालेला आहे.
माईंड डाइटचे घटक व फायदे
माईंड डाइटमध्ये चांगले पदार्थ जास्तीत जास्त निवडावेत आणि वाईट पदार्थ टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. असं याच्यात सुचवलेलं असतं. तर दहा पदार्थ आहेत जे चांगले आहेत. यात हिरव्या भाज्या. हिरव्या भाज्या ह्या मेंदूला संरक्षण देण्यासाठी चांगल्या असतात. असं अभ्यासामध्ये दिसलेले आहे. तर आपल्या रोजच्या जेवणामध्ये हिरव्या भाज्यांचा वापर करण्यात यावा. जितकं शक्य होईल तितकं कच्या भाज्यांचा समावेश करायला हवा. हिरव्या भाज्यांसह इतरही फळभाज्या आहेत, यांचा सुध्दा फायदा होणार आहे.

तसेच नट्स म्हणजेच तेलबियांचा माईंट डाइटमध्ये समावेश केलेला आहे. नट्सचा फायदा आपल्या मेंदूसाठी होऊ शकतो. धान्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केलेले धान्य खाऊ नये. कडधान्य आणि बीन्स यांचा समावेश या आहारामध्ये आहे. आपण जी वेगवेगळी कडधान्य खातो, त्यांचा फायदा आपल्या मेंदूवर होताना दिसतो.
फळांमध्ये माईंड डाइट जो आहे, तो सर्व फळांच्या ऐवजी बेरीज् (स्ट्रॉबेरीज्, ब्यूबेरीज्, रासबेरीज् इत्यादी) यांना प्राधान्य देतो. भारतामध्ये अशी कोणती फळ आहेत, जी मेंदूसाठी फायद्याची ठरतील. यावर सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. मांसाहारामध्ये चिकन आणि मासे यांचे कमी प्रमाणात सेवन केलं तर ते फायद्याचं ठरू शकतं. तळलेला मांसाहार नको, असे या माईंड डाइटमध्ये सांगितले आहे. जर कोणी मद्य सेवन करत असेल, तर त्यामध्ये वाईन (रेड व व्हाईट) ही कमी प्रमाणामध्ये सेवन करू शकता. तसेच त्यांनी असे पण सांगितले की, मेंदूला फायदा होण्यासाठी नव्याने मद्याचे सेवन सुरू करू नका. कारण त्याचे दुष्परिणाम सुध्दा होऊ शकतात.

बटर (लोणी किंवा तूप), डालडा हे हानिकारक पदार्थ असून ते टाळायला पाहिजे. चीज व लाल मांस टाळायला हवं. तळलेले पदार्थ टाळावेत. तसेच गोड मीठाई, पेस्ट्रीज, केक इत्यादी स्वीटस् यांना वाईट पदार्थांच्या यादीत टाकलेले आहे. माईंड डाइटमुळे आपल्या मेंदूचे आरोग्य अबाधित राहायला मदत होते. जितका लवकर माईंड डाइट सुरू कराल, तेवढा जास्त फायदा वाढत्या वयामध्ये होणार आहे.