हायपो म्हणजे कमी होणं. थायरॉईड ग्रंथीचं काम कमी झालं तर त्याला आपण हायपो थायरॉयडिझम असे म्हणतो. थायरॉईड ग्रंथी टी३ व टी४ हे अतिशय महत्त्वाचे हार्मोन्स बनवत असते. ही हार्मोन्स आपल्या शरीराची चयापचय क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक आहे. चयापचय क्रिया सुरळीत सुरु असते तेव्हा आपला मेंदू तल्लक राहतो. ह्रदय, फुफ्फुस, आतडी, त्वचा याचं काम सुरळीत राहतं. जेव्हा ही चयापचय क्रिया कमी पडते. तेव्हा ही सगळी प्रक्रिया मंदावते. त्याने आपल्याला वेगवेगळे त्रास होतात.

बऱ्याच पेशंटना शरीरामध्ये एनर्जी लेव्हल कमी झाल्यासारखे वाटते. अशक्तपणा, थकवा, मसल्समध्ये क्रॅम्पस येतात, अंगावर सुज येते, केस व भुवया विरळ होतात. चेहरा सुजलेला जाणवतो, अशी बरीचशी लक्षणं दिसतात. काहींना झोप पुरेशी झालेली वाटतं नाही, त्यामुळे फ्रेश वाटतं नाही. सारखी झोप येते. काहींना नैराश्य जाणवायला लागतं. विचारांची क्रिया मंदावल्या सारखी वाटते. काही लोकांना विसराळूपणा जाणवतो, असे वेगवेगळे त्रास थायरॉईड हार्मोन्स कमी झाल्यामुळे दिसतात.

काही लोकांच्या आतडीचा वेग मंदावतो. पोट साफ झाल्यासारखे वाटतं नाही. स्त्रीयांमध्ये मासिक पाळी अनियमित होते. मासिक पाळीच्या वेळी अंगावरून जास्त जाणं. अशी लक्षणं दिसून येतात. काही लोकांमध्ये लक्षणं कमी प्रमाणात दिसतात तर काही लोकांमध्ये तीव्र प्रमाणात दिसतात. काही वेळेला गंभीर परिस्थिती सुध्दा दिसू शकते पण ती क्वचितच दिसते. थायरॉईडचं काम कमी होणं हे वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतं. जगभरामध्ये महत्त्वाचं कारणं असं आहे की, आहारामध्ये आयोडिनची कमतरता. आयोडिन हा घटक टी३ व टी४ हार्मोन्स बनण्यासाठी आवश्यक असतो. जर शरीरात आयोडीन कमी असेल तर थायरॉईडचे हार्मोन्स बनत नाहीत. पण आपल्याकडे आयोडिन युक्त मीठ बऱ्यापैकी उपलब्ध असल्यामुळे हे दिसून येत नाही.

आपली प्रतिकार शक्ती थायरॉईड विरुध्द काम करते. त्याच्यामुळे थायरॉईडच्या ग्रंथीवर परिणाम होतो. कधी कधी हा परिणाम लांब काळासाठी असू शकतो. काही वेळेला सर्जरी करून थायरॉईड काढून टाकावे लागते. थायरॉईडला इजा होते. त्याच्यामुळे थायरॉईडचं प्रमाण कमी झालेलं दिसतं. काही लोकांची थायरॉईड ग्रंथी विकसित झालेली नसते. काही औषधामुळे हायपो थायरॉडिझम होऊ शकतं. अशी वेगवेगळी कारणं असतात. डॉक्टर याचा तपास घेतात आणि तुम्हाला त्याचं निदान करून सांगतात.