हायपर थायरॉइडिझम म्हणजेच थायरॉइड ग्रंथीचा स्त्राव वाढणे. हे काय असतं ते समजून घेऊया. त्याची लक्षणं आणि त्याचे उपचार.
आपली थायरॉइड ग्रंथी टी३ व टी४ हे हार्मोन्स स्त्रावत असते. टी३ व टी४ हार्मोन्स रक्तामध्ये जातात आणि शरीराला मदत करतात. पण काही आजारांमुळे या ग्रंथीचा स्त्राव वाढतं जातो. त्यामुळे जी लक्षणं दिसतात, त्याला आपण हायपर थायरॉइडिझम असे म्हणतो. टी३ व टी४ हार्मोन्स शरीरामध्ये वाढतं आणि हे वाढल्यामुळे टीएसएच हार्मोन्सचं प्रमाण कमी होऊन जातं. टीएसएच हार्मोन्सचं प्रमाण कधी कधी इतक कमी होऊन जातं की ते सापडतं सुध्दा नाही.

आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं. घाबरल्या सारखं वाटतं. पेशंटच्या ह्रदयाची गती, धडधड वाढलेली असते. काही लोकांच्या ह्रदयाची गती अनियमित होते. काही पेशंटमध्ये दरदरुन घाम सुटतं असतो. हात थरथरायला लागतात. झोप कमी होते. गर्मी सहन होत नाही. डायरिया सारखा त्रास होतो. बऱ्याच लोकांमध्ये वजन झपाट्याने कमी होतं. काहींचे डोळे मोठे झालेले दिसतात. काहींचे डोळे पूर्णपणे बंद होत नाही. ही काही लक्षणं थायरॉइड ग्रंथीचा स्त्राव वाढण्याची आहेत.

थायरॉइड फंक्शन टेस्ट ही तपासणी आहे. याच्याशिवाय हा आजार वेगवेगळ्या कारणांमुळे झालेला असतो. तर ती कारणं कुठली आहेत, हे तपासण्यासाठी ही तपासण्या केल्या जातात. काही लोकांच्या आहारामध्ये आयोडिनचं प्रमाण वाढून जातं. आपली प्रतिकार शक्ती थायरॉईड विरुध्द काम करते. थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये गाठी तयार होतात आणि या गाठी थायरॉइडचं स्त्राव करत राहतात. हा सुध्दा वेगळ्या प्रकारचा आजार आहे. तसेच काही औषधांमुळे सुध्दा थायरॉईडचं प्रमाण वाढून जातं. हे काही आजार आहेत ज्यात थायरॉईडचं प्रमाण सारखं वाढलेलं दिसतं. प्रत्येक आजारासाठी वेगवेगळ्या तपासण्या डॉक्टर सांगत असतात. त्यामध्ये थायरॉइडची सोनोग्राफी ही एक तपासणी आहे. थायरॉइडचा स्कॅन करता येतो. ह्या काही सामान्य तपासण्या असतात त्या हायपर थायरॉइडिझममध्ये करत असतो.

हायपर थायरॉइडिझमचा उपचार दोन प्रकारे करु शकतो. काही पेशंटला औषध देऊ शकतो. त्याच्यानुसार त्यांचा थायरॉइडचा स्त्राव नियंत्रणात आणता येतो. काहींना रेडिओ अँक्टीव्ह आयोडिन हे दिलं जातं. आणि थायरॉइड ग्रंथी नष्ट केली जाते. मग थायरॉईडचा हार्मोन्स देऊन कंट्रोलमध्ये ठेवता येतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेटमेंट असतात. काही लोकांची सर्जरी करावी लागते. हायपर थायरॉइडिझम हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.