घोरण्याचा आजार हा एक झोपेचा आजार आहे. आपला श्वसन मार्ग झोपेमध्ये अरुंद झाला. तर श्वान घ्यायला अडथळा येतो. व झोप खराब होते. या आजाराचा लठ्ठपणाशी तसेच इतर आजारांशी जवळचा संबंध आहे. झोप खराब झाली तर आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात.

या आजाराचे निदान करण्यासाठी स्लीप स्टडी नावाची तपासणी करतात. तसेच सीपीएपी यंत्राची सुध्दा मदत घेतली जाते. जीवनशैलीत बदल केले तर त्याचा सुध्दा फायदा होतो. बरेच अभ्यास असे सांगतात की, वजन कमी केल्याने घोरण्याचा आजार बरा होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, आहारात बदल आणि वजन कमी केले, तर घोरण्याचा आजार कमी व्हायला मदत होते.

काही अनुभव बघुया
माझे पेशंट राजेंद्र कोल्हे यांना सुरुवातीला डायबेटीस, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा होता. सुरुवातीला वजन ८८ किलो होते. आणि आता ते ७७ किलो पर्यंत आले आहे. त्यांनी त्यांच्या जीवनशैलीत बदल केला, आहार, व्यायाम आणि झोप याकडे जास्त लक्ष दिले. तसेच त्यांची शुगर सुध्दा कमी झाली. त्यांना शुगरची गोळी घ्यावी लागत होती. ती आता बंद करण्यात आली आहे. वजन कमी झाल्याने जो थकवा असतो, तो कमी होतो.