नवीन डायबेटीस आहे, म्हणजेच सहा वर्षांपेक्षा कमी कालावधीत डायबेटीसचे निदान झाले आहे. ज्यांच्या बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) २७ ते ४५ दरम्यान आहे. लठ्ठ अशा लोकांना त्यांनी समावेश केलं होतं. भारताच्या दृष्टीने बघायला गेलं, ज्यांचं बॉडी मास इंडेक्स २३ पेक्षा जास्त आहे, अशा लोकांना ओव्हर वेट असं म्हणतो. ज्या लोकाचं वजन जास्त आहे आणि डायबेटीस आहे. अशा लोकांना या अभ्यासात समाविष्ट करून घेतले आहे.

पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व पेशंटची औषध बंद करून टाकली. तसेच त्यांनी त्यांचा आहार पुर्णपणे बदलून टाकला. म्हणजे उपचार काय केला तर त्यांचा नवीन आहार दिला. हा आहार ८२५ ते ८५० कॅलरीज् च्या जवळपास होता. तर एवढं कमी या लोकांनी खाल्लेलं आहे. वजन कमी करायचं हे त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. प्रत्येक व्यक्तींच १५ टक्के वजन हे कमी करण्याचं त्यांच लक्ष्य होतं. त्यांनी कमी कॅलरीज् चा आहार हा तीन ते पाच महिन्यासाठी दिला.
हळूहळू ह्या लोकांना आरोग्यदायी आहार देण्यास सुरुवात केली. ते इथेच न थांबता लांबपल्ल्यासाठी लोकांना त्यांचे वजन वाढू नये. व्यायाम, आहार, समुपदेशन आणि जी मदत लागेल ती त्यांनी पुरवली. आपण वजन कमी करताना आठवड्याला ५०० ग्रॅम वजन कमी व्हावं असं वाटतं. पण या अभ्यासामध्ये वेगळं असं आहे की, रॅपिडली वजन कमी केले आहे.

जवळपास २४ टक्के लोकांना अपेक्षित वजन कमी करता आलं. वजन कमी करणं सोपं आहे, पण ते टिकवणं कठीण आहे. एक वर्ष वजन कमी करून ठेवणं हे खूप कठीण आहे. जवळपास दर चौथ्यापैकी एका माणसाला हे जमणं शक्य आहे. जर तुमचं बारा महिन्यांपर्यंत एचबीएवनसी ६.५ पेक्षा कमी असणं अपेक्षित आहे. पेशंटला औषध देऊन सुध्दा एचबीएवनसी ६.५ पेक्षा कमी करणं खूप कठीण असतं. त्यांचा मधुमेह नियंत्रणात आणलेला आहे.
डॉक्टर रॉय टेलर यांच्यामते, जोपर्यंत चरबी पुन्हा येत नाही, तोपर्यंत पेशंट बरा असतो. पण चरबी पुन्हा आल्यावर परत मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. आपल्याला या अभ्यासातून असे दिसून आले की, जर वजन कमी करु शकलो. ते वजन १५ टक्क्यांपेक्षा कमी झालं. आणि ते स्थिर ठेवू शकलो. तर डायबेटीस नियंत्रणात राहू शकतो. यांच्या निकालामध्ये असं दिसतं की, जवळपास ५० टक्के लोकांना याचा फायदा झाला. ज्या लोकांनी १५ किलोपेक्षा कमी वजन करणाऱ्यांची संख्या ३६ होती. ३६ पैकी ३१ लोकांचा डायबेटीस अतिशय नॉर्मल आला. म्हणजेच ते एका वर्षासाठी डायबेटीस मुक्त झाले.

ज्यांनी १० ते १५ किलो वजन कमी करणारे २८ लोक होते. त्यापैकी २६ लोकांना फायदा झाला. ज्यांनी अजिबात वजन कमी नाही केलं. त्यांना अजिबात फायदा झालेला नाही. तज्ज्ञ लोकांनी व्यवस्थित प्लनिंग करून अभ्यास केलेला आहे. तर जेव्हा आपण मधुमेहाची औषध बंद करतो, तर ती तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच केली पाहिजे. तसेच तुम्ही औषध सुरू ठेवून उपास नाही करू शकत. याने शुगर अतिशय कमी होऊन जीव जाण्याचा धोका असतो. आहारावर नियंत्रण हा डायबेटीसवरचा सगळ्यात मोठा आधाराचा उपचार असणार आहे. हे करुन बघा, याने फरक नाही पडला तर औषधोपचार करा.