डॉक्टर रॉय टेलर हे बऱ्याच वर्षांपासून अभ्यास करत आहेत. हा त्यांचा पहिला पेपर नसून त्या आधीचा पेपर होता. ज्या लोकांनी कमी कॅलरीज् घेतल्या त्या लोकांचे पोट, पोटामधील अवयवय म्हणजे लिव्हर आणि स्वादुपिंड याच्यामध्ये चरबी साचून राहते. ज्यांच्या लिव्हर आणि स्वादुपिंडामध्ये चरबी साचून राहिलेली आहे. त्यांनी आधी वजन कमी केलं.

१५ टक्के वजन कमी केल्यावर त्यांच्या लिव्हर आणि स्वादुपिंडातील चरबी कमी झाली. त्याचं डायबिटीस सुधारलं. आपल्या डायबेटीसमध्ये चरबीचा खूप मोठा वाटा असतो. इन्शुलिनला प्रतिकार आपलं जे शरीर तयार करतं. हे चरबी वाढल्यामुळे करतं. डॉ. रॉय टेलर खूप छान सांगतात की, तुम्ही सांभाळू शकता त्यापेक्षा जास्त चरबी जर तुम्ही घेऊन फिरत असाल, तर त्याच्यामुळे प्रोब्लेम होऊ शकतात. प्रत्येकासाठी ही चरबी वेगळी असू शकते.
एखाद्यासाठी शरीरातील १० किलो चरबी ही नॉर्मल असू शकते. पण तीच १० किलो चरबी एखाद्यासाठी हानिकारक सुध्दा ठरू शकते. तुम्हाला डायबेटीस होण्याचा धोका आहे का? हे तुमच्या डॉक्टरांशी भेटून तपासून घेऊ शकता.