आपल्याकडे सध्या गोवर आणि रुबेला या रोगांवर लसीकरण सुरु आहे. तसेच काही लोकांच्या मनात शंकापण आहे की, ही लस द्यायची की नाही. एक व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झाला होता. त्यात एक डॉक्टर असे सांगताना दिसतात की, गोवर आणि रुबेला हे किरकोळ आजार आहेत. तर यांच्या विरुध्द इतकी मोठी मोहिम उभारण्याची गरज नाही. यांचा विरोध हा लसीकरणापेक्षा निर्मुलनाच्या मोहिमेला आहे, असे यातून दिसून येतं.
हे सगळं सांगताना एक चुकीचा संदेश या व्हिडिओतून जातोय का? असं मला वाटतं. पोस्टवरील कमेंट पाहिली तर असं दिसतं की, छान माहिती सांगितली आता आम्ही मुलांना लस देणार नाही. लस घेणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. तसेच रोगांशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणेची निती हा सरकारचा मोठ्या पातळीवरचा निर्णय आहे. पण आपण अशा प्रकारचे व्हिडिओ पाहून वैयक्तिक पातळीवर निर्णय घेऊ शकत नाही. या व्हिडिओमधील काही मुद्दे सांगितले आहेत, ते मला पडलेले नाहीत.

गोवर हा प्राणघातक नाही, आणि मृत्यू होत नाही, असे हा व्हिडिओ सांगतो. अमेरिका सुध्दा ६० वर्षापासून गोबर लसीकरण करत आहे. पण त्यांना यात काही यश आलेले नाही. तसेच रुबेला हा किरकोळ आजार आहे. त्याच्या विरुध्द आपल्याला प्रतिकार शक्ती लसीकरण न करता मिळते. मग लसीकरण का करायचं. असे मुळ तीन मुद्दे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात.
डॉक्टर असे सांगतात की, तुम्ही तुमच्या आजोबांना आजीला विचारा, गोवर आजार होऊन कोणाचा मृत्यू झाला आहे का? तर मला असं वाटं की, एका व्यक्तीच्या मताने आपण जग बघू शकत नाही. गोवरमुळे होणारे मृत्यू असं जर गुगल केलं तर तुम्हाला आकडे मिळतील. जागतिक आरोग्य संघटना काय सांगते, २०११ मध्ये जवळपास दीड लाख बालकांचा मृत्यू गोवरमुळे झालेला आहे. १९९० मध्ये बघितले तर हे आकडे जास्त आहेत. गोबर हा आजार आहे. या आजारांचे गुंतागुंत म्हणून निमोनिया, फुफ्फुसांचे इन्फेक्शन आणि मेंदू ज्वर यासारखे कॉप्लिकेशन होऊ शकतात.

लॅन्सेटमध्ये एक पेपर मागे प्रसिध्द झाला होता. त्यामध्ये असे आकडे आहेत की, गोवरमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी ५० टक्के मृत्यू हे भारतात होतात. म्हणजेच भारताच्या दृष्टीने गोवर हा मोठा आजार आहे. लस दिली तर हे मृत्यू टाळता येतात.
सीडीसी काय म्हणतयं, अमेरिका देश १९६३ च्या आधी गोवरचे लसीकरण करत नव्हते. तेव्हा दरवर्षी पाच लाख केसेसची नोंद व्हायची. त्यातले ४०० ते ५०० लोक मरायचे. १००० लोकांना मेंदू ज्वर व्हायचा. त्यांनी लसीकरण केल्यावर काय झालं. ह्यापैकी ९९ टक्के केसेस कमी झाल्या.

बीएमजे या जनरलमध्ये भारतीय डॉक्टरांनी एक पत्र लिहिले आहे. आणि भारतामध्ये रुबेला लस का आवश्यक आहे हे त्यात त्यांनी मांडल आहे. पत्रात त्यांनी सांगितले की, आम्ही भारतभर लोकांची प्रतिकार शक्ती किती आहे, हे तपासलं. काही भागांमध्ये अगदी ६ टक्के लोकांना आजारांचा धोका आहे, तर काही भागांमध्ये २७ टक्के लोकांमध्ये धोका दिसून आला. प्रत्येक भागामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारामध्ये दिसलं आहे. महाराष्ट्रामधले आकडे त्या पत्रामध्ये असे आहेत की, शहरी भागामध्ये ८० टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज् दिसल्या. आणि खेडे विभागात ७३ टक्के लोकांमध्ये दिसून आल्या. यामध्ये २० टक्के शहरी भागामध्ये आणि २७ टक्के ग्रामीण भागातील लोकांमध्ये ह्या आजारांविरुध्द अँटीबॉडीज् नव्हत्या.
अमेरिका रुबेला मुक्त झालेली आहे. कारण, त्यांच्याकडे या आजाराचे लसीकरण झाले आहे. आपल्या मुलीला तिच्या गरोदरपणात रुबेला झाला तर त्याचे गंभीर परिणाम सुध्दा बाळावर होऊ शकतात. अवयवांची वाढ निट न होणं, जन्मतः अवयवांचे आजार असणं हे सुध्दा त्याच्यामध्ये होऊ शकतं. कधी कधी गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे रुबेला सुध्दा हा एक गंभीर आजार आहे. आता तिच्याही मुलांना रुबेला होऊ नये, यासाठी तिला लसीकरण दिले पाहिजे.

गोवर आणि रुबेला यांची लस ही बऱ्यापैकी सुरक्षित आहे. हे तुम्ही वेगवेगळ्या स्तरावर जाऊन पडताळू शकता. लस घेतल्यावर काही लोकांना अँलर्जी होऊ शकते. पण हा धोका कमी स्वरुपात आहे. तर काही लोकांना पुरळ येऊ शकते. हा देखील सौम्य असतो. तुम्ही सुध्दा विचार करा आणि वैयक्तिक पातळीवर निर्णय घ्या.