चिकनगुनिया हा व्हायरस किंवा विषाणूमुळे होणारा आजार आहे. हे विषाणू एडिस किंवा टायगर डासांमार्फत मनुष्यांच्या शरीरामध्ये जातात. चिकनगुनियाचा खरा अर्थ सांधेदुखीने झुकलेला माणूस. तापाशिवाय जोरदार सांधेदुखी चिकनगुनियामध्ये दिसते. ही सांधेदुखी खूप काळ सुध्दा राहू शकते. ह्याच प्रमाणे इतर लक्षण जसे डोकेदुखी, अंगदुखी, अंगावर पुरळ येणं, अस्वस्थ वाटणं हे सुध्दा आपल्याला चिकनगुनियात दिसतं.

चिकनगुनिया हा काही जीवघेणा आजार नाही. त्यामुळे घरी राहून एडमिट न होता सुध्दा आपण याचा उपचार करू शकतो. सांधेदुखी खूप जोरदार असली तरी जीवाला धोका होईल असा हा आजार नाही. पण आपल्याला जो चिकनगुनिया वाटतो हा दुसरा कुठला आजार नाही आहे ना. हे आपल्याला नक्की करणं आवश्यक आहे. टायफाईड, मलेरिया यासारखे आजारांना विशिष्ट औषध देवून आपण बरं करतो.

डेंगू सारखा आजार जो गंभीर होऊ शकतो. अशा आजारांवर खास लक्ष देणे गरजेचे असते. म्हणून आपण जर का धोक्याच्या लक्षण दिसली. तर डॉक्टरांकडे त्वरीत जाणं आवश्यक आहे. वारंवार उलटी होणे, नाकातून/तोंडातून/लघवी संडास वाटे रक्तस्त्राव होणे, चक्कर येणे, दम लागणे/धाप लागणे, लघवी कमी होणे, गुंगी येणे, हातपाय थंड पडणे, बीपी कमी होणे, लहान मुलांमध्ये मुल सारखे रडणे, ही धोक्याची लक्षणं आहेत.
हा व्हायरस म्हणजे विषाणूंमुळे होणारा आजार आहे. याचा उपचार विश्रांती घेणे हा आहे. तापासाठी पॅरासिटामॉल, अंगदुखी व सांधेदुखीसाठी दुखण्याची औषध त्याचप्रमाणे भरपूर पाणी पिणे. नेहमी सारखं जेवण जेवत राहणे. हे आवश्यक आहे. चिकनगुनियापासून वाचण्यासाठी डासांचा नायनाट करा. डासांपासून वाचलं तर डेंगू आणि मलेरिया सारखे आजार सुध्दा होणार नाहीत.