डेंगू हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. विषाणू म्हणजेच व्हायरस. हे जे विषाणू आहेत ते डासांच्या मार्फत नॉर्मल व्यक्तींकडे जातात. म्हणजे डास आजारी व्यक्तीला चावतो आणि डासाला डेंगू होतो. हे डेंगूचे विषाणू डासांच्या शरीरामध्ये वाढतात. तसेच डासांच्या पिल्लामध्ये देखील डेंगूचे विषाणू प्रवेश करतात. डासांमार्फत निरोगी व्यक्तीला जेव्हा हा डास चावतो. तेव्हा त्या व्यक्तीला डेंगूचा आजार होतो. डासांची विल्हेवाट लावणं हे डेंगूसाठी फार आवश्यक आहे.
वैयक्तिक पातळीवर आपल्या सभोवताली डास होणार नाहीत याची काळजी घेऊ शकतो. तसेच महानगरपालिका डासांचा नायनाट करू शकतं. डासांचा नायनाट केल्यावर चिकनगुनिया व मलेरिया सारख्या आजारांना दूर ठेवू शकतो. डेंगू हा तापाचा आजार आहे. पेशंटला ताप, डोकेदुखी, अंगदुखी, पाठदुखी, कधी कधी अस्वस्थ वाटतं. साधारण व्हायरल तापाप्रमाणेच हा ताप असतो. बऱ्याचदा पेशंटला कळत सुध्दा नाही डेंगू झाला आहे. हा सौम्य प्रकारचा डेंगू झाला. दुसऱ्या प्रकारचा डेंगू म्हणजे डेंगू आणि रक्तस्त्राव.

याच्यामध्ये डेंगूच्या लक्षणासोबतच रक्तस्त्रावाची लक्षण दिसतात. हिरडीतून रक्त येणे, लघवीतून रक्तस्त्राव होणे. कधी रक्ताची उलटी होणे. आतड्यामध्ये रक्तस्त्राव झाला तर काळी व चिकट डांबरासारखी संडासला होणे. ही लक्षणं रक्तस्त्रावाची आपल्याल्या दिसू शकतात.
तिसरा डेंगू म्हणजे गंभीर स्वरुपाचा डेंगू. यामध्ये शरीरातील रक्तवाहिन्या पाझरायला लागतात. रक्तस्त्रावाबरोबरच पेशांचे बीपी कमी होणे. श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे, चक्कर येणे आणि पेशंटची कंडिशन सिरियस होणे. अशा प्रकारची लक्षणं आपल्याला दिसून येतात. ज्यांना गंभीर स्वरुपाचा डेंगू आहे, यामध्ये मृत्यू होण्याची सुध्दा शक्यता आहे. त्यामुळे सगळे डेंगूला घाबरुन असतात. पण गंभीर स्वरुपाचा डेंगू हा कमी प्रमाणात होतो. हा डेंगू होण्याची संख्या कमी असते. बऱ्याचशा पेशंटला सौम्य डेंगू झालेला असतो. त्यामुळे डेंगूच्या पेशंटनी घाबरून जाता कामा नये.
काही धोक्याची लक्षणं असतात. ही लक्षणं दिसली तर त्वरीत डॉक्टरांना जाऊन भेटणे आवश्यक असते. पोटात दुखणे, वारंवार उलटी होणे, हातपाय थंड पडणे, चक्कर येणे, बीपी कमी होणे, लघवीला कमी होणे, कधी कधी पेशंटला रक्तस्त्रावाची लक्षणं दिसतात. लहान बाळं हे सारखं रडतं ते लवकर शांत होत नाही. तसेच दुध पिण्याचं प्रमाण कमी होतं. ही सगळी गंभीर आजाराची लक्षणं आहेत.

या आजारामध्ये तीन ते चार दिवस ताप येतो. त्यानंतर ताप कमी होतो किंवा ताप येतंच नाही. पण जी बाकीची धोक्याची लक्षणं आहेत ती ताप गेल्यावर दिसून येतात. कारण की, रक्तवाहिन्या पाझरण्याची शक्यता ही ताप गेल्यानंतर जास्त प्रमाणात दिसते. प्लेटलेट्सच्या पेशी कमी होण्याचं प्रमाण सुध्दा याच काळात दिसून येतं. डेंगूच्या आजारामध्ये डॉक्टर रक्त व लघवीची तपासणी करायला सांगतात. तसेच मलेरिया सारखा आजार नाहीये ना तर हे बघण्यासाठी काही तपासण्या सांगतात.
वेगळी काही अशी औषधे देण्याची गरज पडत नाही. डेंगूच्या विषाणू विरोधी असे कोणते औषध नाही आहे. डेंगूमुळे जो त्रास होतो, तर ते बरे करणारी औषध पेशंटला दिले जातात. सरसकट सगळ्यांच पेशंटला प्लेटलेट्सच्या पेशी दिल्या जात नाही. काही ठराविक पेशंटलाचं प्लेटलेट्सच्या पेशी दिल्या जातात. वैज्ञानिक अभ्यास असा सांगतो की, प्लेटलेट्सच्या पेशी आपोआप वाढतात. काहीही औषध न देता प्लेटलेट्सच्या पेशी एखादा आजार बरा होत आला की, आपोआप वाढायला लागतात.

डेंगूचा इलाज हा आराम करणे आहे. पाणी आणि तरल पदार्थ भरपूर घ्यावेत. याशिवाय तुम्हाला आवडणारी पेय तुम्ही पिऊ शकता. तसेच जितकं जेवण जात असेल, तितकं केलेलं बरं. पेशंटला मळमळ व उलट्या होत असतील तर औषध देतो. अंगदुखी, तापासाठी पॅरॅसिटॅमोल घ्यावं. काही जी दुखण्यावरची औषध आहेत ती टाळायची बघतो. गंभीर डेंगू असेल तर त्याच्यावर अद्यावत उपचार केले जातात.
डेंगूपासून वाचण्यासाठी मच्छरदाणी वापरा. डासांचा नायनाट करा. सौम्य प्रकारचा आजार असेल तर त्याची काळजी घरी घेऊ शकतो. भरपूर पाणी पिण्याची गरज आणि आराम आवश्यक आहे. परंतु धोक्याची काही लक्षणं दिसली तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.