डायबेटीसच्या रुग्णांनी फळे खाऊ नयेत, हा गैरसमज आहे. अँलोपॅथिक म्हणजेच आपण ज्याला मार्डन औषधे म्हणतो. या मार्डन औषधामध्ये असा सल्ला दिलेला आढळत नाही की, डायबेटीज् रुग्णांनी फळे खाऊ नयेत. मार्डन मेडिसिन हे डायबेटीस रुग्णांना फळे खाण्यासाठी प्रोत्साहित करते. जर तुम्ही वैद्यकीय संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर गेलात. अमेरीकन डायबेटीज असोसिएशन किंवा डायबेटीस युके अशा संस्थाच्या सेकंतस्थळावर भेट दिलात, तर रुग्णांसाठी सल्ला म्हणून आहारात फळांचा समावेश असावा. असे दिसून येईल. अगदी आंबा आणि केळी ही फळे सुध्दा खाऊ शकता, असे यादीमध्ये दिले आहे.

फळं ही आहारातील अविभाज्य घटक आहेत. संतुलित आहारामध्ये अर्धा भाग हा फळांनी आणि भाजीपाल्यांनी भरलेला असतो. फळे ही गोड असतात आणि त्याच्यामध्ये शर्करेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लोक अंदाज बांधत असतील आणि त्यातून पुढे हा सल्ला आला असावा, असे मला वाटते. पण फळं ही डायबेटीसच्या दृष्टीकोनातून उपयोगाची आहेत. फळांमध्ये नैसर्गिक तंतूमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय नैसर्गिक पोषक द्रव्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि रंगीत पोषक द्रव्यांचे प्रमाण फळांमध्ये जास्त असतं. या सगळ्या गोष्टींमुळे आरोग्याला फायदा होतो. लठ्ठपणा आणि ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी फळांचा खूप फायदा होतो. शिवाय फळांमध्ये जी साखर असते. ती फळे खाल्लानंतर झपाट्याने आपल्या रक्तात वाढत नाही. कारण फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड हे कमी असतं. म्हणून डायबेटीसच्या दृष्टीकोनातून सुध्दा फळं ही हानिकारक नसतात. त्यामुळे कुठलंही फळ खाण्यासाठी मॉर्डन औषध बंधन घालत नाही. फक्त काही लोकांचा डायबेटीस हा जास्त अनियंत्रित असतो. ते किती कर्बोदक खातात. हे तपासून उपचार करावा लागतो. जेव्हा कार्बोहायड्रेडचा अंदाज घेतो. तेव्हा फळांचा एखाद्या वेळेस समावेश करावा लागतो.

एक सफरचंद, दोन छोटी फळं किंवा मोठ्या आकाराच्या फळाची फोड खाल्यास आपली शुगर वाढत नाही, असे गाईड लाइन्स सांगतात. फक्त फळांचा रसं किंवा स्मूदी बनविण्यामध्ये थोडी आपत्ती असते. फळांचा रस बनवताना ते मिस्करमधून काढतो. तर त्यावर प्रक्रिया झालेली असते. अशा रसामधून शर्करा जास्त शोषली जाऊ शकते. शिवाय रस, ज्यूस, स्मूदी बनवताना त्यात वरून साखर घातली जाते. त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी धोका असतो. महत्त्वाचे म्हणजे कुठलंही फळं औषधी गुणधर्मांनी युक्त असं नसतं. एखादं फळ खाल्यावर साखर नियंत्रणात येईल किंवा डायबेटीस बरा होईल, असे आतापर्यंत वैद्यकीय शास्त्रामध्ये आढळलेले नाही. तसेच कृपया फळांना औषधांचा पर्याय म्हणून वापरू नये. फळे संतुलित प्रमाणामध्ये नक्कीच खाऊ शकता. फळांमुळे आरोग्याला अपाय न होता फायदा होण्याची शक्यता जास्त असते.