फळांचे चांगले गुणधर्म हे सर्वांनाच माहित आहे. फळं ही आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असतात. अगदी मधुमेह/डायबेटीज् रुग्ण असतील, तरी त्यांना फळांची आवश्यकता असते. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी फळांचा मोठा फायदा होतो. फळांचे गुणधर्म आपोआप फळे, फळांचा रस आणि स्मूदी यांना मिळतात का? तर यावर सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे. फळांचा रस आणि स्मूदी प्रचंड लोकप्रिय आहेत. फळांना पर्याय म्हणून फळांचा रस आणि स्मूदी पीत असतो. आपल्या आरोग्याला त्यांचा चांगला फायदा मिळतो का? तर याविषयी चर्चा करणे गरजेचे आहे.

आपण फळे अख्खी खातो. त्यावेळेस फळांच्या रसासोबत तंतूमय पदार्थ मिळतात. अख्या फळामध्ये तंतूमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. तंतूमय पदार्थ (फायबर) हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. आतडीसाठी उपयुक्त आहेत. तसेच पोटातून उपयुक्त जीवाणू असतात. त्यांच्यासाठी सुध्दा हे तंतूमय पदार्थ खूप फायद्याचे असतात. याशिवाय फळांमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. ज्यावेळी आपण अख्खे फळ खातो. तेव्हा पोट भरलेले वाटते. त्यातून शर्करेचे प्रमाण जे शरीरात जातं. त्याचं प्रमाण कमी असतं. तंतूमय पदार्थ भरपूर असल्यामुळे त्यातून शर्करा शोषून घेणं हे आतड्यांसाठी कठीण असतं. आतडीला मेहनत करावी लागते. हळूहळू शर्करा रक्तामध्ये शोषल्या जातात. साखर रक्तामध्ये जलदगतीने शोषली जात नाही. त्यामुळे फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.
अर्थातच, आपण एकाचवेळी २ ते ३ फळे खाल्ली. तर त्यातून भरपूर प्रमाणात साखर शरीरात जात नाही. म्हणून ग्लायसेमिक लोड सुध्दा कमी जातो. जे फायबर शरीरामध्ये जाते. त्याचा फायदा होतो. फळांचा रस आणि स्मूदी काढताना तंतूमय पदार्थ तोडले जातात. त्यातील साखर वेगळी होते. शरीरात लवकर शोषून घेतली जाते. शरीरातील जी रक्तातली साखरेची पातळी लवकर वाढू शकते. म्हणून डायबेटीज् रुग्णांसाठी फळे खा. पण फळांचा रस आणि स्मूदी टाळा, असे संस्था सांगताना दिसून येतात.

इंग्लडमध्ये ‘फाईव्ह अ डे’ नावाचे कॅम्पेन सुरू केले होते. फळे आणि भाजीपाला यांचे पाच वाटे दिवसभरातून खावे, असे सुचवले होते. यात फळांचा रस सुद्धा समाविष्ट होता. काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आले की, फळांचा रस हा फळांपेक्षा कमी पडतो. त्याचे आरोग्यासाठीचे फायदे कमी आहेत. म्हणून त्यांनी फळांच्या रसांना ‘फाईव्ह अ डे’ यातून काढून टाकले. फळांचे व भाजीपाल्यांचे सगळे गुणधर्म हवे असतील. तर ते अख्ख खाणे हे आरोग्यासाठी सर्वोत्तम असते. याशिवाय फळांचा रस आपण कशा पद्धतीने घेतो. याला सुद्धा महत्त्व आहे. आंब्याचा रस खाताना बऱ्याचदा साखर टाकली जाते. रसासोबतचे इतर पदार्थ शुगर वाढवितात. त्यामुळे डायबेटीज् रुग्णांनी फळांचा रस व स्मूदी घेणे टाळावे. ज्यांना दात नाही, त्यांना स्मूदी फायदेशीर ठरते. स्मूदी करताना भाजीपाल्यांचे प्रमाण जास्त असावं. त्यांच्यावरुन साखर घालण्यात येऊ नये. याचे प्रमाण सुद्धा नियंत्रणात ठेवावे.