Scroll to top

बीएमआय बद्दल माहिती


drvinayakadm - May 2, 2022 - 0 comments

आज आपण बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) याबद्दल जाणून घेऊया. बॉडी मास इंडेक्स कसा काढायचा? आम्हाला थोडं किचकट वाटतं. बॉडी मास इंडेक्सचे वेगवेगळे आकडे आम्हाला ऐकायला मिळतात. तर कुठला नॉर्मल समजायचा? आमचे जर मसल्स जास्त असतील किंवा आम्ही दणकट शरीरयष्टीचे असू तर बीएमआय उपयुक्त आहे काय? की आमच्यासाठी वेगळा बीएमआय असायला हवा? असे बरेचशे प्रश्न होते. तर आज आपण याबद्दल थोडसं समजून घेऊया.

    बीएमआय म्हणजे काय?

बीएमआय म्हणजे आपलं वजन जे किलोग्रॅममध्ये घेतलेलं आहे. त्याला आपण आपल्या मीटरमध्ये घेतलेल्या उंचीच्या वर्गानी भागत असतो. आपल्या किलोग्रॅम मधल्या वजनाला मीटर मधल्या उंचीने दोनदा भागत असतो.

Image Source – HealthyChildren.org

    पाश्चिमात्य देशात बॉडी मास इंडेक्सचे कॅलक्यूलेटर किंवा वेबसाईटस् आहेत. त्यांच्यामते तुमचं बॉडी मास इंडेक्स २५ पेक्षा कमी असेल. तर ते नॉर्मल असं दाखवतं. परंतु, भारतीय लोकांसाठी बॉडी मास इंडेक्स हा १८ ते २२.९ एवढा नॉर्मल समजला जातो. १८ पेक्षा कमी असेल तर वजन कमी आहे, असं समजलं जातं. २२.९ पेक्षा जास्त वजन असेल तर त्याला आपण वजन जास्त आहे, असं समजतो. त्यानंतर २५ पेक्षा जास्त बॉडी मास इंडेक्स असेल तर त्याला जास्त लठ्ठपणा असं म्हटलं जातं.

    वजन जास्त आहे म्हणजे चरबी जास्त आहे, असा निष्कर्ष आपण का घेतो. कारण की, सामान्य जनतेमध्ये मोठे होत असतो. त्यानंतर वजन वाढतं ते मुख्यत्वे चरबीचे वजन वाढतं असतं. जसंजसं वय वाढतं जास्त तसंतसं स्नायू व हाडे यांची घनता कमी होते. आणि चरबीचे प्रमाण हे वाढलेले असतं. त्यामुळे मोठ्या लोकांमध्ये शक्यतो काही अपवाद वगळता. जेव्हा वजन वाढलेलं असतं. तेव्हा ते चरबीने वाढलेलं असतं. म्हणून बॉडी मास इंडेक्स हा चरबी वाढली आहे का हे तपासण्यासाठी प्राथमिक निष्कर्ष म्हणून वापरतो.

Image Source – Forbes

    आता काही आजारी व्यक्तीबद्दल बघितलं तर ज्यांना हार्ट फेल्यूअर, शरीराला सूज, जलोधर झालेलं आहे. अशा लोकांमध्ये पाण्याचे प्रमाण खुप जास्त असतं. त्यामुळे त्यांच्या बॉडी मास इंडेक्समध्ये चरबी वाढली आहे, असा निष्कर्ष काढत नाही. जर समजा, बॉडी मास इंडेक्स हा २३ पेक्षा जास्त असेल तर भारतीय लोकांमध्ये चरबी वाढल्याचे प्रमाण खूप जास्त आहे. चरबी तपासण्यासाठी इतरही उपाय आहेत. काही तपासण्या ह्या किचकट व कमी-जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे प्राथमिक उपाय म्हणून आपण बॉडी मास इंडेक्स हा पर्याय निवडत असतो.

    तुम्ही खूप दणकट असला किंवा खूप मेहनतीचे काम करत असाल. तुमचा बॉडी मास इंडेक्स हा २३. ५ असेल, तर गोष्टी थोडी वेगळी आहे. अशावेळी तपासण्याकरून चरबीचे प्रमाण किती आहे हे बघु शकता. याशिवाय चरबीसाठी खूप उपयोगी मापदंड आहे. आपल्या कमरेचा घेर. आपलं कमरेचे जे हाड असतं. थोडसं वर हा घेर मोजत असतो. हा घेर जेव्हा आपण तपासून बघतो. तेव्हा हा घेर ९० सेंटीमीटर पुरुषांमध्ये आणि ८० सेंटीमीटर स्त्रीयांमध्ये याच्यापेक्षा कमीच असायला हवा. चरबीचे प्रमाण जर वाढलं तर आपला धोका वाढतो. पोटाभोवती चरबी जमा झालेली असते. तर ती बऱ्याचदा पोटातील अंतर्गत अवयवांच्या भोवती चरबी जमा होत असते. त्याच्यामुळे पोटाचा घेर वाढलेला असतो. लिव्हर आणि स्वादुपिंड यांच्या भोवती चरबी जमा झाली. तर डायबिटीस होण्याचा धोका जास्त असतो, असं सुध्दा आपल्याला अभ्यासांमध्ये कळलेलं आहे.

Contact Us
close slider

    Discover more from Vinayak Hingane

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×