आज आपण आदर्श वजन किती असावं, याबद्दल बोलणार आहोत. दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक पेशंटचा हाच प्रश्न असतो की माझं वजन किती असावं? उंची नुसार वजन किती असावं?
जेव्हा आपण आदर्श वजनाचा विचार करतो. त्यावेळेला कमी किंवा जास्त वजन असे घटक समोर येतात. तर आपल्याला तिन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो. आदर्श वजन हे बॉडी मास इंडेक्स या मापदंडाने मोजतो. किलोग्रॅमचं वजन घेऊन त्याला उंचीच्या वर्गाने भागायचं. बॉडी मास इंडेक्स हा भारतीयांसाठी २३ पेक्षा कमी असणं. हे योग्य आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. जर का २३ पेक्षा जास्त असेल तर त्याला ओव्हर वेट असं म्हटलं जातं.
लहान मुलांमध्ये त्याचं वजन वाढतयं का? याच एक आलेख काढत असतो. त्यात एक ठरावीक गतीने वाढतंय का हे बघत असतो. ज्यांची वाढ पूर्ण झालेली आहे त्यांच्यासाठी फार काळजीचं नसतं की वजन किती आहे. बऱ्याचदा लोकांना कमी वजन असेल तर त्याचा न्यूनगंड असतो. ज्या व्यक्तीला कुठलाही त्रास नाही काहीच प्रोब्लेम नाही. तर तो कितीही बारीक असेल तर त्याला काही प्रोब्लेम नाही. कारण काही लोकांच्या शरीराची ठेवणं तशी असते. ज्यांची वाढ पूर्णपणे झालेलं आहे, तरी त्यांचे वजन कमी असणं हे काळजीचं असू शकतं.

ज्याचं वजन कुठलेही प्रयत्न न करता कमी होत चाललं आहे. तर हे काळजीचं कारण ठरू शकतं. कारण की, काही आजार हे असे असतात. ज्याच्यामुळे वजन कमी होतं. मग आपण डॉक्टरांना भेटतो. तपासण्या केल्यानंतर असं कळतं की कोणते आजार नाही आहेत. तर काळजी करण्यासारखं काही नाही. काही वेळेस एखादा आजार असतो आणि वजन कमी होतं असतं. आणि आजार ठीक होताना वजन वाढतं जातं.
आपल्या शरीराची वाढ १८ ते २० या वर्षांपर्यंत पूर्ण होते. त्यानंतर आपले स्नायू व हाडं पण वाढतं नाहीत. म्हणून २० साव्या वर्षीचं वजन हे आपलं आदर्श वजन असू शकतं. त्यांच्यापेक्षा खूप जर वजन वाढलं तर ते काळजीचं ठरू शकतं. ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी स्नायू बळकट करून वजन वाढवलेलं चांगलं असतं. स्नायू मोठे झाले की वजन वाढतं. हा एक योग्य मार्ग झाला वजन वाढविण्याचा.
आपलं वजन हे चरबीच्या स्वरुपात वाढतं असतं. तर ही चरबी एका पातळीपेक्षा जास्त वाढली. तर आपले शरीर ती चरबी हाताळू शकतं नाही. मग होर्मोन्समध्ये बदल घडतात आणि जीवनशैलीचे आजार सुरू होतात. काही लोकांचं १५ ते २० किलो वजन वाढलं तर त्यांची शुगर वाढून जाते. त्यांना ब्लड प्रेशर वाढतं. हार्ट अँटक येतो. तसेच या लोकांनी वजन कमी केलं तर आजार कमी सुध्दा होतात. काही जणांचं तीस किलो वजन वाढलं तरी तेवढा प्रोब्लेम दिसत नाही. म्हणून प्रत्येकाच वाढलेलं वजन हे सारखंच नसतं.

बॉडी मास इंडेक्सनुसार बघितलं तर बॉडी मास इंडेक्स हा २३ च्या असावा. काहींचा २२ ते २३ असला तरी त्यांना जीवनशैलीचे आजार दिसतात. ज्यांना जीवनशैलीचे आजार आहेत. त्यांनी वजन कमी केलं तरी त्यांना फायदा होतो. हे वेगवेगळ्या अभ्यासामध्ये दिसून आलेलं आहे. काही अभ्यासामध्ये असं दिसलं आहे की तुमचं सात ते दहा टक्के वजन कमी केलं तर तुमचा डायबेटीस नियंत्रणात येतो. एका अभ्यासातून असे दिसून आले की, १५ किलो वजन कमी केल्यामुळे डायबेटीस नियंत्रणात आला आहे. ते ही औषधांशिवाय.
बॉडी मास इंडेक्स सोडून वजनासाठी किंवा आपल्या वाढलेल्या चरबीसाठी स्वतंत्र असं एक मापदंड आहे. जो आपल्याला चांगली माहिती देतो. तो म्हणजे पोटाचा घेर. आपली जर शरीरातली चरबी वाढली, तर ती आपल्या पोटाच्या सभोवताली जमा होते. तर ही चरबी कशी मोजायची तर कमरेचा घेर मोजायचा. आपल्या नाभीच्या दोन बोट खाली मेजर टेप घेऊन पोटाचा घेर मोजायचा. तो पुरुषांचा ७८ सेंटीमीटर पेक्षा कमी असला पाहिजे. आणि स्त्रीयांचा ७२ सेंटीमीटर पेक्षा कमी असला पाहिजे. पुरुषांचा ९० सेंटीमीटरपेक्षा जास्त झाला. स्त्रीयांचा ८० मीटर पेक्षा जास्त झाला तर ते धोक्याचं ठरू शकतं.
पोटाचा घेर हा या आकड्यापासून कमी ठेवायचा प्रयत्न केला तर आपल्याला निश्चितच फायदा होतो. माझं वजन कमी असेल तर न्यूट्रीशियनची कमतरता भासेल का? पोषक द्रव्ये आणि वजन यांच्या काहीही संबंध नाही आहे. त्याचा आहाराशी संबंध आहे. आहारामध्ये विविधता ठेवा. कच्चा आहार, पाले भाज्या, फळं, डाळी, कडधान्य, नटस् या सगळ्यांचा समावेश आहारात असू द्या. तुमच्या आहाराची विविधता आणि पोषक द्रव्य सुधारतात. याच्याशिवाय आपल्या जीवनशैलीमध्ये नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताणतणाव नियंत्रण, व्यसनांपासून दूर राहणे यागोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. या घटकांचे पालन केले तर आपले वजन नैसर्गिकरित्या वाढायला मदत होते.