रक्ताची कमतरता हा एक कॉमन प्रोब्लेम आहे. आणि खूप दुर्लक्षित सुध्दा आहे. बऱ्याच लोकांना माहिती सुध्दा नसतं की आपले हिमोग्लोबिन किती आहे. काही लोकांना माहिती असून ही त्यावर कोणते उपचार केले जात नाही. त्यावेळेस आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.
आपलं हिमोग्लोबिन किती असावं? हिमोग्लोबिन ग्रामपर डेसिलिटरमध्ये मोजतो. पुरुषाचे हिमोग्लोबिन १३.५ ग्राम/डेसिलिटर ते १७.५ ग्राम/डेसीलिटर आणि स्त्रीयांचे हिमोग्लोबिन १२.० ग्राम/डेसीलिटर ते १५.५ ग्राम/डेसीलिटर असते. जर यापेक्षा कमी असेल तर त्याला आपण एनेमिया (रक्ताची कमतरता) असे म्हणतो.

हिमोग्लोबिनची कमतरता ही काही लोकांमध्ये सौम्य तर गंभीर स्वरुपाची असते. अर्थातच ज्यांना गंभीर समस्या असेल तर त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करत असतो. तसेच हिमोग्लोबिन कमी असेल तर याच्याबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे आणि योग्य सल्ला घेतला पाहिजे. हिमोग्लोबिन कमी होण्यासाठी वेगवेगळी कारणे असतात. त्यातली काही कारणे ही साधारण असतात. म्हणजेच फारशी धोकादायक नसतात. तसेच काही कारण गंभीर ही असू शकतात.
आहारातील पोषक द्रव्यांची कमतरता असणे. हे एक साधारण कारण आहे. उपचार घेऊन आहार नीट घेतला तर हिमोग्लोबिनची कमतरता सुधारू शकतो. काही लोकांमध्ये गंभीर स्वरुपाचा आजार हा हाय एनेमियाच्या मागे लपलेला असतो. वारंवार होणारा रक्तस्त्राव. हा रक्तस्त्राव हा छुपा असतो. याच्यामुळे कमतरता होऊ शकते. काही जुनाट आजार असतात, त्याच्यामुळे कमतरता होऊ शकते. लिव्हर आणि किडनीचे आजारमध्ये रक्ताची कमतरता दिसायला लागते. रक्ताचा, आतडीचा आणि अन्ननलिकेचा कर्करोग असू शकतो, त्याच्यामध्ये सुध्दा एनेमिया हे लक्षण म्हणून दिसून येते.

तुम्हाला जर रक्ताची कमतरता दिसत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. रक्ताची कमतरता असेल तर कोणते लक्षण दिसतात? काही लोकांना अशक्तपणा, थकवा, छातीत धडधड होणे, दम लागणे, चक्कर येणे ही लक्षण दिसून येतात. ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता झपाट्याने होत असेल तर ही लक्षण तीव्रतेने जाणवतात. ज्यांना रक्ताची कमतरता हळूहळू होत जाते त्या लोकांमध्ये ही लक्षण सौम्य स्वरुपात जाणवतात.
एनेमियाचा उपचार हा त्याचं मुळ कारण शोधून त्याला ठीक करणं हे आहे. याशिवाय रक्त वाढीची औषध आपण देत असतो. लोह व लोहाचा उपचार, व्हिटॅमिन्स बी१२ आणि बी६ याची कमतरता लोकांमध्ये असते. ज्याचं रक्त खूप कमी आहे. त्या लोकांना रक्तपेशी देत असतो. शरीरामध्ये व्हिटॅमिन्स, लोहाची कमतरता तयार झालेली असते. तेव्हा ती लवकर भरुन काढण्यासाठी औषध द्यावी लागतात. औषध घेतल्यावर झीज भरुन निघते आणि आहाराने आपल्याला त्याचं प्रमाण चांगल्या स्वरुपात टिकवून ठेवता येतं.
मांसाहारामधून लोह आणि व्हिटॅमिन मिळत असतात. शाकाहारी आहारामध्ये लोह असतं. तर यांचा समावेश आहारामध्ये असायला हवा. विविधतेने नटलेला आहार घेतल्यावर पोटातील उपयुक्त जीवाणू सुधारायला मदत होते.