आपल्या रक्तवाहिन्या या सुरेख पध्दतीने तयार झालेल्या असतात. रक्तवाहिन्या आकुंचन आणि प्रसरण पावणाऱ्या असतात. रक्तवाहिन्या शुध्द रक्त अवयवांकडे घेऊन जाते. त्या रक्तवाहिनीला धमनी असं म्हणतो. धमनी ही मोठ्या प्रमाणात आकुंचन आणि प्रसरण पावू शकते. एखाद्या अवयवाला ऑक्सिजनची जास्त गरज असते. तेव्हा वेगवेगळे रासायनिक सीगनल्स आपल्या रक्तवाहिन्याला मिळते.

ही रक्तवाहिन्या त्यानुसार आकुंचन व प्रसरण पावते. जास्त रक्त पुरवठ्याची गरज असेल तर ती रक्तवाहिनी प्रसरण पावते. प्रसरण पावल्यावर त्याच्यातून रक्त पुरवठा हा जास्त प्रमाणात होतो. त्या अवयवाची गरज असते ती पूर्ण होते. जेव्हा ही रक्त वाहिनी आजारी पडते. रक्तवाहिन्यांच्या भींतीमध्ये दोष निर्माण होतो. तेव्हा याची लवचिकता ही कमी होते. रक्तवाहिनीची लवचिकता कमी झाली तर ती पूर्णपणे प्रसरण पावू शकत नाही. त्या अवयवाला रक्त पुरवठा ज्या प्रमाणात हवा असतो. त्या प्रमाणात मिळत नाही. मग त्यावेळी त्या अवयवाला इजा व्हायला सुरू होते. पुरेशा प्रमाणात रक्त पुरवठा मिळाला नाही, तर ऑक्सिजन मिळत नाही. व्यर्थ पदार्थ त्यामध्ये साचून राहायला लागतात. त्या अवयवाला इजा व्हायलाला सुरुवात होते.

जेवढी जास्त प्रमाणात किंवा कायम स्वरुपी इजा होईल. तेवढ्या जास्त प्रमाणात वेदना अवयवांमध्ये निर्माण होतात. ह्रदयाचा रक्तपुरवठा कमी झाला. तर ह्रदयाला इजा होते. आतडीचा रक्त पुरवठा कमी झाला तर आतडीला इजा होते. जर स्नायूंना रक्त पुरवठा कमी झाला तर स्नायूंना इजा पोहोचते. इथे वेदना व्हायला लागतात. पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आणि ब्लॉकेज असतात. तर चालल्यानंतर त्यांच्या पायामध्ये वेदना होऊ लागतात. ज्यांच्या आतडीच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाले तर पोटामध्ये दुखी लागते. ज्याच्या ह्रदयाचा रक्तपुरवठा कमी झाला तर छातीमध्ये दुखतं.