नवीनचं व्यायाम सुरू करणार असाल तर काय काळजी घ्याल. याविषयी आपण माहिती घेऊया. बऱ्याच लोकांना काळजी वाटते की, आम्ही व्यायाम सुरू केला तर काही त्रास होणार नाही ना? व्यायाम करताना धोका जास्त कुणाला असू शकतो आणि कुणाला कमी असतो? काय त्रास होऊ शकतो याविषयी समजून घेऊ. काय काळजी घेऊ शकतो?
व्यायाम करताना सगळ्यांनाच त्रास होण्याची शक्यता नसते. जे लोक निरोगी आहेत, त्यांनी व्यायाम सुरू केला तर त्यांना धोका अतिशय कमी असतो. पण एखाद्या व्यक्तीला आजार असेल किंवा आजारावरील औषध सुरू असतील. तसेच शारीरिक क्षमता मुळातच कमी असेल. अशा व्यक्तीने व्यायाम सुरू केला आणि जास्तच व्यायाम केला तर यांना धोका जास्त असतो. अशा लोकांना डॉक्टरांचा सल्ला घेऊन कुठला व्यायाम केला पाहिजे आणि कुठला व्यायाम नाही केला पाहिजे. काही लोक अशी असतात की, चालल्यावर व फिरल्यावर दम लागतो. अशांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन काही तपासण्या करून घ्याव्यात. कारण व्यायाम करताना अशा लोकांना त्रास होण्याचा धोका जास्त असतो.

ज्यांचा स्टॅमिना चांगला आहे. कुठलाच आजार नाही आहे. अशा व्यक्तींनी सुध्दा एक काळजी घ्यावी. ती म्हणजे आपण व्यायामाची सुरुवात करत असताना आपल्याला झेपेल एवढाचं व्यायाम करावा. हळूहळू त्या व्यायामाची तीव्रता वाढवत जायची. म्हणजे काय होईल तर आपल्या शरीराला त्या व्यायामाशी जुळवून घेण्याची संधी मिळेल. तसं जर केलं तर आपल्याला त्रास होण्याचा धोका कमी असतो. स्नायूंना आणि जॉइन्टसना इजा होण्याचा धोका जास्त असतो. आपण अचानक जास्त व्यायाम केला तर आपल्याला इन्जूरी होऊ शकते. आपल्यासोबत एखादा ट्रेनर किंवा प्रशिक्षक असेल तर त्याच्यामुळे आपल्याला त्रास होण्याचा धोका कमी होऊन जातो. अगदी योगाचा व्यायाम असो, चालणं-फिरणं असो तर एखादा प्रशिक्षक असेल तर आपल्याला फायदा होतो. काही लोकांचा व्यायाम चुकीचा होतो. त्यामुळे त्यांना इंज्युरी होतात.
सोपे सोपे जे व्यायाम असतात ते सुरुवातीच्या काळामध्ये करावेत. सोपे व्यायाम केल्याने कॉन्फिडन्स आणि शरीराची कार्यक्षमता वाढायला मदत होते. मग आपण कठीण व्यायाम करु शकतो. या सोप्या गोष्टी आहेत पण महत्त्वाच्या आहेत. व्यायाम केल्यानंतर स्नायू किंवा मसल्स दुखू लागतात. आपल्या स्नायूंना व्यायामाची सवय नसते त्यामुळे व्यायाम केल्यानंतर स्नायू दुखरे होतात. पण हे सामान्य असतं सगळ्यांच्याच बाबतीत घडतं.

धावणं आणि दोरीवरच्या उड्या हा व्यायाम सुरक्षित आहे. फक्त आपल्या शरीराला त्या व्यायामाची सवय व्हायला वेळ लागते. योग्य प्रकारे व्यायाम केले तर इंज्यूरी कमी होतात. असा पण एक समज असतो की, उतारत्या वयात व्यायाम करु नये. परंतु हा समज पुर्णपणे चुकीचा आहे. उतारत्या वयात व्यायाम केल्याने स्नायू व हाड मजबूत होण्याबरोबर मेंदू सुध्दा तल्लक राहण्यास मदत होते.