बऱ्याच मित्रांनी आणि पेशंटनी हा प्रश्न विचारला की, आम्ही नवीनच जीम सुरू करतोय. तर आम्ही कुठले व्यायाम केले पाहिजे. याबद्दल थोडी माहिती सांगा. बऱ्याचदा लोकांची इच्छा असते व्यायाम सुरू करण्याची पण कुठून सुरुवात करायची हे त्यांना कळत नाही.
जीम सुरू करत असताना शक्यतोवर शरीराचे जे मोठे स्नायू आहेत. ह्यांचा व्यायाम आपण सुरू करत असतो. पाय, छाती, पाठीचे स्नायू असतील, ओव्हर मसल्स असतील, पोटाचे स्नायू असतील, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. आपण मोठ्या स्नायूंपासून व्यायामाला सुरुवात करत असतो. याचे काही फायदे आहेत.

पाठीच्या कण्याना मजबूती देणारे जे स्नायू असतात. ते बळकट होतात आणि आपली दुखापत कमी होते. ज्या पध्दतीने आपल्या शरीराची ठेवणी करायची असते. ते करायला मदत होते. याच्या शिवाय मोठ्या स्नायूंचा व्यायाम चांगला झाला तर ते स्नायू बळकट होतात. आणि आपल्याला वजन कमी करायला सुद्धा मदत होते. तसेच शरीरसौष्ठव चांगल दिसायला मदत होते. सुरुवात जी आहे ती आपण पायांचे स्नायू, ओव्हर स्नायू आणि शरीराच्या वरच्या भागावरचे स्नायू यांच्या पासून आपण सुरुवात करत असतो.
अप्पर, लोअर आणि होल बॉडी अशा पद्धतीचे शेड्यूल असतं. व्यायाम करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये जे कंपाउंड एक्सरसाइज आहेत. फक्त एकच स्नायू किंवा ठरावीक स्नायूंचा व्यायाम न करता. वेगवेगळ्या स्नायूंच्या गटांचे व्यायाम एकत्रपणे केले जातात. तर असे व्यायाम मानवी शरीरासाठी फायद्याचे ठरतात. शरीराच्या खालच्या भागाच्या व्यायामामध्ये स्क्वॅट्स (उठाबशा), लंजेस्, डेडलिफ्ट हे व्यायाम प्रकार खालच्या स्नायूंचे असतात. याच्यामध्ये इतर स्नायूंचे गट आहेत. यांचा सुद्धा समावेश व्यायामामध्ये होतो. त्याच्यामुळे कंपाउंड एक्सरसाइज सुरुवातीच्या काळात महत्त्वाचे ठरतात. तसेच अप्पर बॉडीचे कंपाउंड एक्सरसाइज आहेत, ज्याला आपण पुशअप्स (जोर), पुल-अप् या प्रकारचे व्यायाम हे सुरुवातीच्या काळात गरजेचे असतात.

आपल्या शरीराची जी बांधणी आहे. ती सुधारण्यासाठी मदत होत असते. पुढील काळामध्ये जेव्हा आपण ठरावीक स्नायूंचे व्यायाम करतो. त्यावेळी दुखापत कमी होते. व्यायाम सुरुवातीला कमीत कमी वजनामध्ये करण्यात यावेत. व्यायाम करताना आपल्या शरीराची ठेवण याकडे लक्ष देण्याची गरज असते. जसजशी शरीराची क्षमता वाढत जाते, तसतसा व्यायाम वाढवत नेत असतो. ट्रेनरच्या देखरेखीखाली व्यायामाची सुरुवात केली तर ती अतिशय उत्तम असते.