‘हायपोग्लिसेमिया’ म्हणजे शुगर कमी होणं. आपली रक्त शर्करेची पातळी सामान्य पातळी पेक्षा कमी होते तेव्हा त्याल ‘हायपोग्लिसेमिया’ असे म्हणतो. हायपोग्लिसेमिया कमी झाली तर आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. म्हणून हायपोग्लिसेमिया होऊ नये हा आपला प्रयत्न असतो. डायबेटीसचे रुग्ण ज्यांना आपण शुगर कमी होण्यासाठी औषध देतो. त्यांना शुगर खुप कमी होण्याचा धोका असतो.
आपल्या शरीरातील अवयवांच्या पेशींतील काम नीट व्हायला पाहिजे. नीट झालं नाही तर आपलं आरोग्य खराब होतं. जीवाला सुध्दा धोका होऊ शकतो. हे सगळे अवयव सुरक्षित राहावे यासाठी शुगरची पातळी ठराविक असणं आवश्यक असतं. ही शुगरची पातळी ७० पेक्षा वर असेल तर अवयव नीट काम करतात. जर ही पातळी ७० पेक्षा कमी गेली तर त्याचं काम खराब होऊ शकतं. खास करून मेंदूचं काम. शुगरची पातळी नेहमी ७० च्या वर रहावी. म्हणून आपलं शरीर नेहमी झटत असतं. आपल्या शरीरामध्ये सुरक्षा प्रणाली असते जी आपल्या शुगरची पातळी ७० पेक्षा खाली येऊ देत नाही.

आपल्या शरीरामध्ये शुगर ग्लायकोजनच्या स्वरुपात साठवून ठेवलं जातं. ग्लायकोजन आणि इतर घटकांपासून शुगर बनविण्याचं काम आपले शरीर व लिव्हर करत असतं. म्हणून जेव्हा शुगर कमी होते, तेव्हा आपले शरीर हे शुगर स्वतः बनविते. तर हे नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये होत असतं. म्हणून कुठल्या सामान्य व्यक्तीची शुगरची पातळी कमी होत नाही. पण ज्यांना लिव्हर, किडनी, संप्रेरकांचे आजार, डायबेटीस आजार अशा आजारांमध्ये शुगर लो होते. शुगर लो झाली तर पेशंट बेशुध्द किंवा त्याला आकडी येऊ शकते. कधी कधी मृत्यू सुध्दा होऊ शकतो. तर शुगर कमी झाल्यामुळे हे गंभीर स्वरुपाचा धोके होऊ शकतात.
शुगर कमी का होते? तर आपल्याला काही आजार असतील तर शुगर कमी होते. डायबेटीस रुग्णांमध्ये शुगर कमी का होते, तर याची काही महत्त्वाची कारणे आहेत. औषध चुकीची घेणे. आहार कमी झाला. उलटी व जुलाब जास्त प्रमाणात झाले. नेहमी पेक्षा कर्बोदके खूप कमी घेतली जातात. यामुळे सुध्दा शुगर लो होतं असते. व्यायाम नेहमी पेक्षा जास्त झाला, तर शुगर लो होऊ शकते. तसेच इन्शुलिन चुकीचं घेणं, यामुळे सुध्दा शुगर लो होऊ शकते.

आपल्याला घाबरल्या सारखं वाटणं, छातीत धडधड, ह्रदयाचे ठोके वाढणे. थरकाप सुटणे, हातपाय कापणे, दरदरून घाम सुटणे, गोंधळ्यासारखं वाटणे, याच्याशिवाय तीव्र स्वरुपाची भूक लागणे, पोटात खड्डा पडल्यासारखं वाटणं ही सगळी शुगर लो होण्याची लक्षण आहेत. पेशंट बेशुध्द होणे, आकडी येणे, कधी कधी पेशंट कोमामध्ये जातात. तर मृत्यू सुध्दा होऊ शकतो. ही गंभीर लक्षण आहेत.
शुगर लो ची लक्षणं दिसली तर काय करायला पाहिजे? उपलब्ध असेल तर शुगर तपासून घेतली पाहिजे. लगेच काही तरी खाल्लं पाहिजे. मार्गदर्शक तत्वे असं सांगतात की, तुम्ही १५ किलो ग्लुकोज खा. आणि १५ मिनिटांनी पुन्हा शुगरची तपासणी करा. शुगर एकदा कमी झाली तर ती वारंवार सुध्दा कमी होऊ शकते. त्यामुळे शुगर वर लक्ष ठेवाव लागतं. शुगर कमी झाली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा असतो. पण शुगर वाढण्यापेक्षा लो होण्याचे धोके जास्त असताता. म्हणून त्वरीत काहीतरी खाऊन घेणं गरजेचे असते. काही पेशंट हे बेशुध्द अवस्थेत असतात, तर अशा पेशंटसाठी काही इंजेक्शन असतात. तर ती इंजेक्शन दिल्याने शुगर वाढायला मदत होते. बेशुध्द व्यक्तीला खूप खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या श्वसननलिकेत जाऊन त्याने ही धोका वाढू शकतो. बेशुध्द पेशंटला तातडीने दवाखान्यात नेऊन सलाईन द्वारे ग्लुकोज देणं आवश्यक आहे.