हिमोग्लोबिन एवनसी समजून घेणार आहोत. एचबीएवनसी म्हणजे नेमकं काय असतं? ही तपासणी आपण डायबेटीसच्या रुग्णांना करायला का सांगतो? आणि याचे फायदे काय आहेत?
आपल्या शरीरामध्ये ज्या लाल रक्तपेशी असतात. या लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचं प्रथिन असतं. याच्यात प्रथिनाची साखळी असते. आणि त्यात लोह सुध्दा असतं. ह्याचा उपयोग आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी होतो. आपल्या शरिरामधली रक्त शर्करा (ब्लड ग्लुकोज) आहे. हे ग्लुकोज कधी कधी हिमोग्लोबिनला चिकटून जातं. तेव्हा त्याला आपण रक्त शर्करा चिकटलेलं हिमोग्लोबिन असं म्हणतो. तसेच आपण याला ‘एचबीएवनसी’ असेही म्हणतो.

आपल्या शरीरातील ग्लुकोजची पातळी सामान्य असते. तेव्हा हे कमी प्रमाणात चिकटतं. कारण जास्तीत जास्त शर्करा उपलब्धच नसते चिकटण्यासाठी ती इंधन म्हणून वापरली जाते किंवा ग्लायकोजन म्हणून साठा केला जातो. तर कमी प्रमाणात ही रक्त शर्करा हिमोग्लोबिनला चिकटं. त्यामुळे एचबीएवनसीचं प्रमाण कमी राहतं. जेव्हा रक्त शर्करा जास्त प्रमाणात असते. तेव्हा रक्त शर्करा जास्त प्रमाणात हिमोग्लोबिनला चिकटते आणि एचबीएवनसीचं प्रमाण वाढलेलं दिसतं.
साखरेची पातळी कमी असेल तर एचबीएवनसी कमी असतं. आणि साखरेची पातळी जास्त असेल तर एचबीएवनसी जास्त असतं. आपल्या ज्या रक्तपेशी असतात. त्या नवीन रक्तपेशी तयार होत असतात, तर तिचा जिवनकाळ साधारणतः तीन महिने असतो. एकदा नवीन रक्तपेशी तयार झाली. ती आणि त्या रक्तपेशीतले हिमोग्लोबिन जवळपास तीन महिने आपल्या रक्तामध्ये असतं. ह्या तीन महिन्यांमध्ये आपली शुगर कधीपण वाढली. शुगर हिमोग्लोबिनला चिकटते आणि एचबीएवनसीच प्रमाण वाढलेलं दिसतं.

डायबेटीसच्या उपचारामध्ये आपल्याकडे जितकी जास्त माहिती असेल त्याने पेशंटचा उपचार चांगल्या प्रकारे करता येतो. एचबीएवनसी तपासणी केल्यावर आपल्याला गेल्या तीन महिन्यात किती शुगर वाढली हे दिसून येतं. एचबीएवनसी सामान्य असेल किंवा सामान्याच्या जवळ असेल तर कॉम्प्लिकेशनचा धोका आणि गुंतागुतींचे आजार होण्याचा धोका कमी असतो. एचबीएवनसी जर जास्त असेल. तर कॉम्प्लिकेशनचा धोका हा जास्त असतो.
सामान्यपणे एचबीएवनसी हे ५.७ टक्के कमी असतं. ५.७ ते ६.५ टक्क्यापर्यंत असेल तर त्याला आपण डायबेटीसची पहिली पायरी असे म्हणतो. एचबीएवनसी ६.५ टक्क्याहून जास्त असेल तर त्याला आपण डायबेटीस असे म्हणतो. छोटे-छोटे प्रोब्लेम्स निदान करताना येतात. त्या शंका दूर करण्यासाठी एचबीएवनसी मदत होते. डायबेटीसच्या रुग्णांनी दर सहा महिन्यांने एकदा एचबीएवनसी तपासणी केली पाहिजे.