काही मधुमेह पेशंट हे साखरे ऐवजी गुळ खायला सुरुवात करतात. त्यांना असं वाटतं की गुळ खाल्ल्याने माझी ब्लड शुगर लेव्हल वाढणार नाही. आणि गुळामुळे काही घटक द्रव्य मिळतील ज्याचा फायदा होईल. ह्या ज्या पेशंटच्या अपेक्षा असतात, त्या गुळ हा पुर्ण करतो का हे आज आपण पाहूया.
साखर म्हणजेच शुक्रोज ही फ्रुक्टोज आणि ग्लुकोज यांच्या मिश्रणापासून बनलेलं असतं. साखर खाल्ली जाते, तेव्हा आतडीमध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोज वेगवेगळे होतात. त्यांच पचन होतं आणि ते रक्तामध्ये शोषून घेतले जातात. ही क्रिया पटकन होते, त्यामुळे ग्लुकोजची पातळी झपाट्याने वाढते. हे वारंवार होत असेल तर त्याचा परिणाम हा इन्शुलिनच्या पातळीवर देखील होतो. याच्यामुळे इन्शुलिन रेसिस्टंट आणि लठ्ठपणा हे प्रोब्लेम सुरू होतात. हे डायबेटीस सुरु होण्याची लक्षण आहेत. त्यामुळे आपण साखर असलेले पदार्थ कमी खायला हवेत.

आपल्या मेंदूवर ग्लुकोजच्या पातळीचा परिणाम होतो. मग आपल्याला ह्या गोष्टी हव्याहव्याशा वाटायला लागतात. आणि आपण गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खायला लागतो. त्यामुळे आरोग्याचे इतर प्रोब्लेम होण्यास सुरुवात होते. हेच गुळाच्या बाबतीतही तितकं खरं आहे. रासायनिकदृष्ट्या बघायला गेलं तर गुळामध्ये शुक्रोज आणि ग्लुकोजचे प्रमाण ९० ते ९५ टक्के असतं. त्यामुळे आपण गुळ खाल्लं तरी हे सगळं सेम आपल्या शरीरामध्ये घडणार. हे वेगवेगळ्या अभ्यासामधून सुध्दा दिसून आले आहे.
गुळ खाऊन कोणाचं लोह वाढतं नाही. जर लोहाची कमतरता असेल तर औषधाच्या स्वरुपात लोह देणं गरजेचे आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युट्रीशियन जी एक राष्ट्रीय संस्था आहे. यांच्यामते, लोह वाढण्यासाठी जे आहार घटक आहेत, तर ते कुठले कुठले आहेत, तर हिरव्या पालेभाज्या, डाळी, नटस्, कडधान्य याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. राजगिऱ्यामध्ये तर भरपूर लोह असतं. हे घटक आहारामध्ये वापरू शकता. तसेच मांसाहारापासून लोह मिळतं. म्हणून हे काही सोपे उपाय आहेत गुळाच्या तुलनेमध्ये. साखर किंवा गुळ खायचा याकडे लक्ष द्या.

जे लोक नॉर्मल आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नाही. त्यांनी सुध्दा रोजच्या आहारातील साखर व गुळ कमी ठेवलं तरी ही त्यांना लॉन्ग टर्ममध्ये फायदाच होणार आहे. आर्टिफिशनल स्वीटनर्स जे शुगर फ्रीच्या गोळ्या असतात. या गोळ्यांचा काही कालावधी नंतर पेशंटच्या आतडीतील जीवाणूंवर वाईट परिणाम होतो. पण हे सगळ्यांच स्वीटनर्समध्ये न होता काही स्वीटनर्समध्ये आढळून आले आहे.