आज मी तुम्हाला आमचे पेशंट तुकाराम चौधरी यांची गोष्ट सांगणार आहे. तुकाराम हे माझ्याकडे सप्टेंबर महिन्यात आले होते, त्यावेळी त्यांचे एचबीएवनसी ११.२ होता. त्यांची शुगर सुध्दा जास्त होती. म्हणजे जेवणापुर्वी २४६ आणि जेवणानंतर ४२० एवढी जास्त होती. आम्ही त्यांना जीवनशैलीत बदल करायला सांगितले आणि आहारात बदल सांगितला.

त्यापूर्वी कोलेस्ट्रॉल आणि लघवी हे सगळं तपासून घेतलं होतं. त्यावेळी त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे काही घटक वाढले होते. त्यांनी एक आठवडा जीवनशैलीत बदल केल्यानंतर औषधांशिवाय सुध्दा त्यांची शुगर कंट्रोलमध्ये आली, असे आपल्याला दिसतं. त्यांची उपाशीपोटीची शुगर १०५ आली आणि जेवण झाल्यावर १४२ आली. त्यानंतर आम्ही त्यांचा कमी कॅलरीजचा आहार सुरू ठेवला. त्यानंतर त्यांची शुगर नियंत्रणात येऊ लागली. तसेच त्यांच्या पोटाचा घेर सुध्दा कमी होत गेला. काही दिवसानंतर त्यांचे कोलेस्ट्रॉल सुध्दा नियंत्रणात आला हे दिसून आले. कुठलं ही औषध न घेता डायबेटीस हा नियंत्रणात येऊ शकतो. यासाठी आपल्याला व्यायाम, आहार आणि झोप यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे.
त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात ऐकुया
नमस्कार, मी तुकाराम चौधरी माझी शुगर वाढल्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून डॉ. विनायक हिंगणे सरांकडे ट्रिटमेंट घेतली. त्यावेळी साखर जास्त होती. मात्र, मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल केला. आहारात बदल केल्यानंतर एका आठवड्यात शुगर कमी झाली. सध्या कोणताही त्रास होत नाही. आहार व व्यायाम करून मधुमेह बरा झाला. आरोग्यासाठी तब्बेतीने बारीक दिसणं चांगले आहे.