टाईप – २ डायबेटीस या आजाराला आपण जीवनशैलीचा आजार असे म्हणतो. हा आजार होण्याची दोन मुख्य कारणं असतात. त्यातल पहिले म्हणजे अनुवंशिकता. अनुवंशिकता असणं आवश्यकच आहे, असे नाही. काही लोकांना अनुवांशिक घटक व जनुकिय घटक असतात. त्याच्यामुळे टाईप २ डायबेटीस होण्याचा धोका वाढतो. पण अनुवंशिकतेपेक्षा जनुकिय कारणांपेक्षा महत्त्वाचे कारण असे की, चुकीची जीवनशैली.
चुकीची जीवनशैली म्हणजे काय, तर आपला आहार चुकीचा असणे. व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, शारीरिक हालचाल कमी असणे, झोपेचे दोष असणे. याशिवाय सततचा ताण-तणाव असेल तर तो सुध्दा एक धोक्याचा घटक आहे. लठ्ठपणा हे सुध्दा टाईप २ डायबेटीस होण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. तर हे जे आपल्या जीवनशैलीत चुकीचे घटक असतात. याच्यामुळे टाईप २ डायबेटीस होण्याचा धोका वाढतो.

डॉ. रॉय टेलर या तज्ज्ञांनी खूप छान अभ्यास केला आहे. डायरेक्ट स्टडी नावाच्या अभ्यासामध्ये त्यांनी आपल्याला दाखवून दिलं. आपल्या गरजेपेक्षा जास्त चरबी शरीरामध्ये असेल, तर त्याचा परिणाम आपल्या लीव्हर आणि पँनक्रियाजवर होतो. जास्तीची चरबी लिव्हर आणि पँनक्रियाजमध्ये जमा होते आणि त्याच्यामुळे त्यांचे काम कमी होते. आणि मग आपल्याला टाईप २ डायबेटीस होतो. झपाट्याने वजन कमी करून चरबी नष्ट केली. तर ते काम सुधारतं. डायबेटीस कुठल्याही औषधांशिवाय नियंत्रणात येऊ शकतो.
भारतामध्ये ही बरेच मधुमेह रुग्ण मुळातून बरे होताना दिसून येत आहे. बऱ्याच रुग्णांना औषधाशिवाय डायबेटीस नियंत्रणात ठेवता येतोय. यासाठी नियमित व्यायाम, आहार योग्य प्रकारे घ्यावा लागतो, वजन कमी करावे लागते, जीवनशैली निरोगी ठेवावी लागते. आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये सुध्दा हेच सांगितले आहे. जर टाइप २ डायबेटीस असेल तर पहिला उपाय जीवनशैली सुधारणे आणि वजन कमी करणे हाच आहे.