डायबेटीससाठी एखादी गोळी किंवा औषधं सुरू झालं. म्हणजे आपला डायबेटीसचा उपचार सुरू झाला असं मुळीच समजू नका. डायबेटीसचा उपचार हा वेगवेगळ्या पातळीवर करण्यात येतो. आणि वेगवेगळे पैलू आपल्याला ध्यानात घ्यावे लागतात. तुमचा स्वतःचा डायबेटीसचा उपचार हा कसा होतोय. तर आज आपण डायबेटीस उपचाराचे वेगवेगळे पैलू या विषयावर चर्चा करणार आहोत.
डायबेटीसचे वेगवेगळे प्रकार असतात. परंतु जीवनशैलीचे बदल याला अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण की कुठल्याही प्रकारचा डायबेटीस असला. तरीही आपला व्यायाम, शारीरिक हालचाल, आहार, झोप आणि ताणतणाव नियंत्रण यांना खूप मोठं महत्त्व डायबेटीसच्या उपचारामध्ये आहे. वरील उपाय योग्य पध्दतीने करतो, तेव्हा आपली साखरेची पातळी नियंत्रणात यायला मदत होते.

साधारण टाइप टू ड़ायबेटीस आहे. जो कॉमनली दिसणारा डायबेटीस आहे. आजाराची प्रक्रिया मुळातून बदलता येते. म्हणजे डायबेटीस मुळातून नियंत्रणात आणता येतो. डॉ. रॉय टेलर यांच्या संशोधनानुसार, जर आपण जीवनशैलीत बदल करून झपाट्याने वजन कमी केलं. तर डायबेटीस हा औषधांशिवाय नियंत्रणात येतो.
आता डायबेटीसच्या उपचारांचा वेगळा पैलू असा आहे की, इन्शुलिनची ज्यांना गरज असते. ज्यांच्या शरीरामध्ये इन्शुलिनचा पुर्णपणे अभाव असतो. अशा पेशंटला वरुन इन्शुलिन द्यावं लागत. इन्शुलिनची गरज पुर्ण करणे हा सुध्दा डायबेटीसच्या ट्रेटमेंन्टचा भाग आहे. इन्शुलिनची कमतरता झाली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणून ज्या ज्या लोकांना डायबेटीसच्या इन्शुलिनची कमतरता असेल, तर त्यांना आपल्याला इन्शुलिन द्यावं लागतं.

पेशंटला काही डायबेटीसची गुंतागुंत आहेत का? याचा आढावा घ्यावा लागतो. याच्यासाठी काही तपासण्या करत असतो. शारीरिक तपासणी करत असतो. डायबेटीसच परिणाम हा आपल्या सगळ्या अवयवांवर होऊ शकतो. डोळे, किडनी, रक्तवाहिन्या तसेच आपल्या शरीरातील ज्या नसा असतात. त्यांच्यावर परिणाम होतो. हे सगळे परिणाम आपल्याला तपासून बघता येतात. जर आपल्याला अशी काही लक्षण दिसली. तर त्याचा लवकर उपचार करता येतो.
डायबेटीसच्या सोबत येणारे काही आजार असतात. जे डायबेटीसचे मित्र आजार असतात. तर ह्या आजारांवर सुध्दा आपल्याला लक्ष ठेवावे लागते. जसं की, डायबेटीस बरोबर ह्रदयविकार हा आजार कॉमनली दिसतो. तर अशा पध्दतीने डायबेटीसचा सर्वागिण उपचार करता येतो.