डायबेटीसच्या रुग्णांनी उपवास करावा का? उपवास करता येऊ शकतो का? हा प्रश्न खूप वारंवार विचारला जातो. आणि काही लोकांसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न असतो. कारण काही डायबेटीसचे रुग्ण असतात, त्यांना उपवास करण्याची फार तीव्र इच्छा असते. हे त्यांच्यासाठी आध्यात्मिक कारण असू शकतं. धार्मिक कारण असू शकतं. काही लोकांना वजन कमी करण्यासाठी उपवास करायचा असतो. तर बऱ्याच रुग्णांना इच्छा असते तसेच जिव्हाळ्याचा विषय असतो. याच विषया संदर्भात आपण थोडीसी चर्चा आपण करणार आहोत.

उपवास करावा की नाही याच उत्तर सरळ सरळ नाही आहे. कधी डॉक्टर सरळ सांगून टाकतात की उपवास करू नका. पण ज्यांचा डायबेटीस जरा सौम्य आहे. ज्यांना थोडा सौम्य उपवास करायचा आहे. अशा लोकांना कधी कधी ते शक्य सुद्धा असतं. डॉक्टरांच्या मदतीने आपण सहजपणे करू शकतो. पण काही रुग्णांसाठी उपवास हा खूप त्रासदायक ठरू शकतो. तर कुठले रुग्ण आहेत, ज्यांच्यासाठी उपवास करणं कठीण असतं. त्यांनी तो टाळायला हवा. कुठल्या रुग्णांना थोडीशी काळजी घेऊन उपवास करू शकतो. तर आपण याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत.
अर्थातच तुम्ही डायबेटीस रुग्ण असाल. तर तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांना भेटून तुमचे रिपोर्ट आणि तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही करू शकता. एक जनरल चर्चा तुमच्या माहितीसाठी करतोय. उपवासामध्ये महत्त्वाचे दोन घटक आहेत.
एक म्हणजे उपवासाचा प्रकार. तुम्ही कुठल्या प्रकारे उपवास करणार आहात. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्या डायबेटीसची तीव्रता. आता आपण पहिला घटक बघुया. उपवासाचा प्रकार.
उपवासाचे तीन प्रकार आपल्याला साधारणपणे करता येतात. एक म्हणजे ठराविक कालावधीसाठी काहीही न खाणे. एकतर लोक निर्जली उपवास करतात. अशा पध्दतीचे लोक उपवास करत असतात. मुस्लिम लोक सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत काहीही खात नाहीत. हा उपवासाचा प्रकार अतिशय कडक असतो. हा उपवास करत असताना ज्यांना इन्शुलिन आहे किंवा स्ट्राँग औषध डायबेटीसची सुरू आहेत. तसेच तीव्र डायबेटीस असेल तर अशा व्यक्तीला औषध घेतल्यानंतर खूप काळ उपाशी राहिल्यानंतर शुगर कमी होण्याचा आणि धोकादायक पातळीपर्यंत कमी होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे ज्यांचा डायबेटीस तीव्र आहे. आणि त्यांना अशा पध्दतीचा कडक उपवास करायचा आहे. त्यांच्यासाठी धोका जास्त असतो.

तसेच ज्यांचा सौम्य उपवास आहे. आपण त्यांची गोळी कमी करू शकतो. तर अशा लोकांनी कडक उपवास केला तरी चालतो. परंतु, सुरुवातीला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच काही लोकांचा उपवास हा सौम्य स्वरुपाचा असतो. त्याच्यामध्ये ते कमी खात असतात. उपवासाला चालणारे पदार्थ आहेत. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेडचे प्रमाण किती हे बघुन आपल्याला औषध एडजस्ट करुन देता येतात. याच्याशिवाय काही लोकांचा उपवास असतो. ज्याच्यामध्ये ते आहार कमी करतात. हा उपवास डायबेटीसच्या दृष्टीकोनातून थोडा सोपा असतो. कारण आपण सुरुवातीलाचं ह्याची औषध एडजस्ट करून देऊ शकतो. आहाराचा शुगर लेव्हलवर काय परिणाम होईल याचा अंदाज घेता येतो.
तुमचा डायबेटीस किती स्वरुपाचा गंभीर आहे हे बघावं लागतं. याच्यामध्ये काही लोकांना इन्शुलिन सुरू असतं. इन्शुलिन फक्त शुगर कंट्रोलसाठी नसतं. तर त्यांच्या शरीराला इन्शुलिनची गरज असते. म्हणून अशा रुग्णांचे इन्शुलिन बंद करता येत नाही. जर अशा लोकांना सौम्य प्रकारचा उपवास करायचा असेल तर त्यांना इन्शुलिनचा डोस कमी करून देऊ शकतो. परंतु अशा लोकांना कडक उपवास करणं टाळायला पाहिजे.

शुगर लो झाली आणि आपल्याला हायपोग्लायसेमिया झाला. तर तो खूप गंभीर स्वरुपाचा होऊ शकतो. त्यामुळे अशा रुग्णांनी कडक उपवास करणे टाळायला पाहिजे. काही लोकांच्या डायबेटीसची तीव्रता खूप कमी असते. त्यांना औषधे खूप सौम्य प्रकारची चालू असतात. तसेच काही लोकांना डायबेटीसची औषधंच देत नाही. फक्त डाईट कंट्रोल सांगितलेला असतो. त्यांच्यावर त्यांची शुगर कंट्रोलमध्ये राहते. असे लोक उपवास करू शकतात.
कुठला निर्णय मनाने घ्यायचा नसतो. डायबेटीसच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपवास करायला नको. डायबेटीसवरची औषध सुरु ठेवून उपवास करणं सुध्दा हानिकारक आहे. औषध बंद करुन ही उपवास करणं धोकादायक ठरू शकतं.