Scroll to top

मधुमेह! गहू की ज्वारी?


drvinayakadm - July 5, 2022 - 0 comments

मधुमेहग्रस्तांसाठी गहू की ज्वारी यातले महत्त्वाचे काय आहे, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. या विषयाला दोन पैलू आहेत. गहू खरचं इतका वाईट आहे का? दुसरं म्हणजे ज्वारी खरोखरच छान आहे का?

Image Source – Prabhasakshi.com

    गव्हाविषयी सोशल मीडियावर चर्चा रंगलेली असते. लोक सांगतात की, गहू वाईट आहे. गव्हामधले ग्लूटेन शरीरासाठी हानिकारक आहे. ग्लूटेन हे प्रथिन गव्हामध्ये असतं. आपल्यासाठी हे प्रथिन सरकट वाईट नाही आहेत. काही पेशंटना ज्यांना ग्लूटेन सेंसिटिव्हिटी नावाचा आजार असतो. ज्यांना हा आजार आहे. त्याचं शरीर ग्लूटेन सहन करत नाही. ग्लूटेन असलेले कोणतं धान्य त्यांनी खाल्लं तर ग्लूटेनच्या विरुध्द शरीरात अँलर्जी सारखी रिएक्शन येते. त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. अशा लोकांना ग्लूटेनचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असतो. परिणामी, त्याचं आरोग्य धोक्यात येतं.

इतर जे लोक आहेत त्यांना ग्लूटेनचा कोणताही त्रास होत नाही. आपल्याकडे ग्लूटेन सेंसिटिव्हिटी असणाऱ्या रुग्णांची संख्या खूप कमी आहे. त्याच्यामुळे सर्वसाधारण जनतेसाठी गहू खाणं हे आरोग्यासाठी हानिकारक नाही आहे. ग्लूटेनविषयी संशोधन करत असताना जे लेख सापडले. त्यानुसार आहारात ग्लूटेन जास्त असेल तर डायबिटिज पासून बचाव होतो. 

Image Source – Navbharat Times

    आहारात ग्लूटेन कमी असेल तर डायबेटीज टाईप-२ चा धोका जास्त असतो. आपण साधा अर्थ घेऊ लावू शकतो, ग्लूटेनमुळे डायबेटीज होतो हे खर नाही आहे. त्यामुळे गव्हाला घाबरून जाता कामा नये. जिथे प्रमाण असतं. तिथे गव्हाला घाबरणे गरजेचे आहे. आपण ज्या प्रमाणात गहू किंवा कर्बोदक खातोय. ते खूप जास्त आहे. त्याचबरोबर तेलाच व तुपाचं प्रमाण वाढलेले आहे. आहारात स्निग्ध पदार्थ व गव्हासोबत तृणधान्याचे प्रमाण हे जास्त असल्याने लठ्ठपणा व मधुमेह वाढणे, याचा धोका वाढतो. म्हणून प्रमाणाबद्दल आपण नक्कीच जागृत असावं.

योग्य प्रमाणात गहू खाल्याने त्याचा धोका कमी जाणवतो. ज्वारीत औषधी गुणधर्म आहेत का ? तर ज्वारी शिवाय इतर तृणधान्य आहेत. त्याविषयी सुध्दा असं सांगण्यात येतं की, काही विदेशी धान्य आहेत (उदा. ओट्स इत्यादी) आरोग्यासाठी आणि डायबेटीजसाठी फायद्याचे आहेत. आपल्या आहारातील विविधतेचा फायदा होता. पण ठराविक एखाद्या तृणधान्याचा औषधी गुणधर्म डायबेटीजच्या फायदासाठी होतो. विज्ञानात असा ठोस पूरावा सापडलेला नाही. जेव्हा आपण तृणधान्य खातो. तेव्हा त्याच्यातून औषधी फायदा मिळेल. म्हणून ती खाऊ नये. वेगवेगळी तृणधान्य खाल्ली तर त्याचा आहाराची विविधता वाढण्यासाठी फायदा होता. विविधता असलेला आहार घेणं, हे अधिक चांगलं आहे.

Image Source – Lybrate

    विविधता वाढविण्यासाठी वेगवेगळी तृणधान्य व कडधान्य खाऊ शकता. पण त्यातील एखादे तृणधान्य खाऊन डायबेटीज बरा होईल, असा समज चुकीचा आहे. काही पेशंट पोळी बंद करून भाकरी खातात. तर अशा पेशंटच्या शुगरमध्ये कोणताही फरक दिसत नाही. हा फरक का दिसत नाही, तर एका तृणधान्याला दुसऱ्या तृणधान्यांनी बदललेले आहे. पण त्याचं प्रमाण आपण कमी केलेले नाही. आहारातील इतर घटकांमध्ये सुधारणा केलेली नसते. तसेच आहाराच संतुलन सुधारलेले नसतं. आता माझं मतं असं आहे की, तृणधान्य किंवा कर्बोदक हे आपण जेव्हा खातो. तेव्हा त्यांच्या प्रमाणाकडे लक्ष दिले पाहिजे. खासकरून डायबेटीज रुग्ण असाल, तर तृणधान्यांचे प्रमाण नियंत्रित ठेवणे फार आवश्यक असते. तृणधान्य खात असताना, जर ती अख्खीची अख्खी वापरली. म्हणजे जेव्हा पीठ करताना गाळून न घेता वापरली. याशिवाय अख्खे दाणे असतात. ते भिजवून जर खाल्ले. तर त्याचा थोडाफार फायदा मिळू शकतो. पण धान्याचे प्रमाण हे नियंत्रित असणं गरजेचे आहे. त्याच्यानुसार आपल्या शुगरची पातळी ठरत असते. कर्बोदकाचा ताण आपल्या शरीरावर किती पडतो. हे या तृणधान्याच्या प्रमाणावरून ठरत असतं. याच्याशिवाय जेव्हा आपण ही तृणधान्य इतर काही घटकांसोबत खातो. जसं की, तेल, तूप यांच्यावर प्रक्रिया केलेली आहे का ? या गोष्टींचा सुध्दा परिणाम होत असतो. म्हणून आहार बदल करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे.

Contact Us
close slider

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×
    %d bloggers like this: