डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतः औषध घेणं याच्यामधून जे प्रोब्लेम होतात. त्याला दोन पैलू आहेत. एक म्हणजे आपल्याला औषधांविषयी अपुरं ज्ञान असतं. जेव्हा आपल्याला अपुरं ज्ञान असतं ते धोकादायक ठरू शकतं. हे औषधांच्या बाबतीत फार प्रामुख्याने घडत. दुसरा म्हणजे डॉक्टरांचा अनुभव व त्याचं निरिक्षण स्वतःविषयीचं. हे आपल्याला मिळत नाही, जेव्हा आपण स्वतः औषध घेतो तेव्हा. कोरोनाच्या बाबतीत सुध्दा हेच घडत. कसं घडत ते आपण बघुया?

आपण औषध ज्यावेळेला घेत असतो, त्यावेळी तीन प्रकारचे प्रोब्लेम होऊ शकतात. काही औषधांचे साईट इफेक्ट जास्त असतात तर काहींचे कमी असतात. ज्या औषधांचे साईड इफेक्ट जास्त असतात त्याबद्दल डॉक्टर चेतावणी देतात. जेव्हा आपण स्वतः औषध घेतो त्यावेळेला ही माहिती बऱ्याचदा आपल्याला माहित नसते. त्याच्यानंतर औषधांचा डोस सुध्दा महत्त्वाचा असतो. त्याच्याविषयी अपुरी माहिती असेल तर प्रोब्लेम होऊ शकतो. पॅरासिटॅमॉल हे नेहमीचं उदाहरण आहे. याचे साईड इफेक्ट कमी असून सेफ औषध आहे. पण त्याचा डोस जास्त झाला. तर त्याची विषबाधा होऊ शकते, म्हणून डॉक्टर आपल्याला त्याचा सुध्दा डोस किती प्रमाणात घ्यायचा हे सांगतात. विटॅमिन डी चा डोस एका ठरावीक मात्रेपेक्षा जास्त झाला. तर मग आपल्याला त्याचे सुध्दा दुष्परिणाम दिसायला लागतात.

कधी कधी डोस कमी होतो. त्याच्यामुळे आपल्याला अपेक्षित फायदा होत नाही. त्याच्यामुळे सुध्दा प्रोब्लेम होतात. डोस हा व्यक्तीच्या वजनानुसार आणि तर औषधानुसार बदलू शकतो. म्हणून डोसच्या बाबतीत ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. तसेच ज्यावेळी दोन औषध एकत्र घेतो त्यावेळी त्यांच्यातून गुंतागुंती प्रक्रिया होण्याची शक्यता जास्त असते. डॉक्टर जेव्हा औषध देतात तेव्हा त्यांच याकडे लक्ष असतं. हे जेव्हा बघितलं जातं तेव्हा गुंतागुंत टळते. म्हणून डॉक्टरांचा सल्ला याबाबतीत महत्त्वाचा ठरतो.

दुसरं म्हणजे डॉक्टरांचे निरिक्षण. डॉक्टरांचं औषध लिहून देणं हे नुसतं काम नाही आहे. तर तुमचा आजार किती गंभीर आहे. तुमच्या औषधोपचारामध्ये कोणता बदल करण्याची गरज आहे का? हे सगळं डॉक्टर बघत असतात. तुम्हाला एडमिट किंवा अत्यावश्यक सेवेची गरज आहे का? हे सुध्दा डॉक्टर सांगु शकतात. हे लवकर घ़डल तर आपण गंभीर आजार टाळू शकतो. म्हणून डॉक्टरांचा सल्ला हा आपल्यासाठी खूप आवश्यक असतो. तसेच डॉक्टरांच्या सल्लानुसार औषध घ्या. सोशल मीडियावरील पोस्ट बघून स्वतः औषध घेणे टाळा.