सध्या बऱ्याच लोकांना सर्दी पडस, खोकला, ताप इत्यादी लक्षण दिसतं आहेत. लोकांच्या मनात ही शंका आहे. ही लक्षण आम्हाला कोरोनामुळे दिसत आहेत की दुसऱ्या कुठल्या आजारामुळे दिसत आहे. काही लोकांना अँलर्जी असते, खाण्यामध्ये आंबट पदार्थ आला तर सर्दी पडस होतं. तर काहींना धुळींच्या संपर्कात आल्यावर सर्दी पडस होतं. काही लोकांना उन्हात गेल्यावर ताप येतो. लोकांचे आधीचे अनुभव आणि त्याच्यावरून त्यांना त्रास झालेला असतो. तर त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न करतात. ही लक्षण इतर कुठल्या आजारामुळे झालेली आहेत का? असं लोकांना वाटत असतं.

खरं म्हणजे जेव्हा साथ रोग आलेला असतो. तेव्हा तुम्हाला त्या साथ रोगाची लक्षण दिसली, तर तोच आजार असल्याची शक्यता जास्त असते. कोविडची साथ आलेली असताना जर कोरोनाची लक्षण दिसली तर शक्यता जास्त आहे की, तुम्हाला कोविड असू शकतो. म्हणून अशा परिस्थितीमध्ये तपासणी केलेली उत्तम असते. कुठल्या ही आजाराचे निदान ठोस करायचे असेल. चाचण्या व तपासण्या करणं आवश्यक असतं. आता लक्षणावरून ही आपल्याला अंदाज येतात.

एखाद्या व्यक्तीला जास्त त्रास होत असेल, तो जास्त दिवसांसाठी दिसत असेल किंवा त्या व्यक्तीला इतर काही लक्षण सुध्दा दिसत असतील. नेहमींच्या अँलर्जीच्या लक्षणापेक्षा वेगळी. तर त्या व्यक्तीला कोविड झाला आहे. जर परिवारामध्ये इतर व्यक्तींना सुध्दा तुमच्या सारखी लक्षण दिसत असतील तर जास्त शक्यता आहे की, हा साथ रोग कोविड आहे. अशा वेळी तपासण्या करून घेणं जास्त गरजेचे ठरत. तुम्हाला काही धोक्याची लक्षण दिसत असतील. म्हणजे काय तुम्हाला चार-पाच दिवसांपासून जास्त ताप, अस्वस्थ वाटणे, धाप लागणे किंवा ऑक्सिजनचे प्रमाण ९५ पेक्षा कमी असेल. तर तुम्हाला तातडीने वैद्यकीय मदत घेण्याची गरज आहे.

आपण ज्या टेस्ट करतो त्या दोन प्रकारच्या असतात. स्वॅब टेस्ट करतो. त्यानंतर कोविड रॅपिड अँटिजेन टेस्ट किंवा कोविड आरटीपीसीआर टेस्ट करतो. या दोनपैकी कुठली टेस्ट केली असेल आणि ती पॉझिटिव्ह आली असेल तुमची लक्षण कोविडमुळेच आहेत, असं समजा. तसेच तपासणी निगेटिव्ह आली असेल तर मात्र आपण खात्रीशीरपणे सांगु शकत नाही की कोविड आहे की नाही. काही लोकांना कोविड असेल तरी ही त्यांची तपासणी निगेटिव्ह येऊ शकते. कोविड झाला तर घाबरुन जाऊ नका, कोविड हा फार त्रास न देता बरा होऊन जातो.