नुकतीच मी बीबीसी न्यूजवर एक बातमी वाचली तीच तुमच्यासोबत शेअर करतोय. इंग्लंडमध्ये ज्या आरोग्यविषयक वैद्यकीयशास्त्राच्या गाईड लाइन्स तयार करणारी जी संस्था आहे. त्याला ‘नाईस्’ (NICE – National Institute for Health and Care Excellence) असे म्हणतात. ही मार्गदर्शक तत्त्व सांगणारी संस्था आहे. ती वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी खूप महत्त्वाची असतात.
आपल्या उंचीच्या निम्म्यापेक्षा सुध्दा कमी पोटाचा घेर असला पाहिजे. म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीची उंची साधारण १७० सेंटीमीटर असेल तर त्याचा निम्मा म्हणजे ८५ सेंटीमीटर. तर त्या व्यक्तीच्या पोटाचा घेर हा ८५ सेंटीमीटर पेक्षा कमी असला पाहिजे. म्हणजेच तुमची ढेरी दिसायला नको.

मी नेहमीच पोटाचा घेर मोजत असतो. आणि पोटाच्या घेराविषयी बोलत असतो. कारण की, पोटाचा घेर हे महत्त्वाचं साधन आहे. याच्यावरून कळतं की, तुमच्या शरीरामध्ये जी हानिकारक चरबी आहे. ती चरबी आपल्या पोटात जमा झालेली चरबी असते. पोटाचा घेर आपल्याला दर्शवतो की पोटामध्ये चरबी जास्त वाढली आहे का? जर चरबी वाढली असेल तर त्याचा विपरित परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यातूनच डायबेटीस, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, किडनीचे आजार, रक्तवाहिन्यांचे आजार हे सगळे पोटाच्या चरबीमुळे होणारे आजार असतात. ही जर चरबी कमी केली तर हे आजार नियंत्रणात राहतात. कधी-कधी आजारांपासून संरक्षण सुद्धा होतं. तर आता ह्या ज्या नवीन गाईड लाइन्स आलेल्या आहेत. त्या सोपं करून सांगतात.
डब्ल्यूएचओच्या ज्या गाईड लाइन्स आहेत. त्यासुद्धा हेच सांगतात की, भारतीय उपखंडातील जे लोग आहेत. यांच्या पोटाचा घेर पुरुषांचा ९० सेंटीमीटर पेक्षा कमी आणि स्त्रीयांचा ८० सेंटीमीटर पेक्षा कमी असला पाहिजे. पोटाचा घेर जर वाढला तर लगेच डॉक्टरांकडून तुमची शुगर आणि ब्लड प्रेशर चेक करून घ्या. असं हे मार्गदर्शक तत्त्व सांगतं. कारण की, ज्यांची ढेरी जास्त आहे, अशा लोकांना धोका जास्त असतो.
भारतीय तज्ज्ञांनी सांगितल्या प्रमाणे, पुरुषांच्या पोटाचा घेर ७८ पेक्षा जास्त आहे, त्यांनी सुद्धा सतर्क राहायला हवं. स्त्रीयांच्या पोटाचा घेर ७२ पेक्षा जास्त असेल तर त्यांनी सुद्धा सतर्क राहणे आवश्यक आहे. जास्त वजन वाढवू देऊ नका आणि शुगरवर लक्ष ठेवा. तज्ज्ञांच्या लक्षात असे की, पुरुषांचा पोटाचा घेर ७८ आणि स्त्रीयांचा ७२ पेक्षा कमी असेल तर त्यांना या आजारापासून सुरक्षा मिळते.

पोटाचा घेर मोजायचा कसा?
तुमच्या नाभीच्या दोन बोट खाली पोटाचा घेर मोजायचा असतो. व्यक्तीने सरळ दोन्ही पायावर वजन देवून ताठ उभं राहिलं पाहिजे आणि दुसऱ्या व्यक्तीने पोटाचा घेर मोजला पाहिजे तर ते अचूक मोजमाप मिळतं.
आहार, व्यायाम आणि झोपेचे नियम नीट पाळले. जीवनशैली निरोगी ठेवली तर आपल्या पोटाचा घेर आपोआप कमी होतो. एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त पोटाचे व्यायाम करून पोटाचा घेर कधीच कमी होत नाही. कारण पोटामध्ये स्नायू कमी असतात. पोटाचा घेर वाढण्याचे कारण म्हणजे चरबी जमा होणं हे असतं.